शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:55 IST

"फोनवरील हे संभाषण जवळपास 35 मिनिटे चालले. दरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली..."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना कॅनडामध्ये आयोजित जी7 शिखर परिषदेतून परतताना काही वेळासाठी अमेरिकेत थांबण्याची विनंती केली. मात्र, पंतप्रधान मोदींनी यासाठी नकार दिला. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, फोनवरील हे संभाषण जवळपास 35 मिनिटे चालले. दरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली.

परराष्ट्र सचिव म्हणाले, "आपण कॅनडातून परतताना अमेरिकेत येऊ शकता का? असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारले होते. यावर पंतप्रधान मोदी यांनी पूर्व निर्धारित कार्यक्रमांचा हवाला देत असमर्थता व्यक्त केली. खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रस येथून ते कॅनडा येथे जी७ परिषदेत भाग घेण्यासाठी गेले होते. यानंतर ते क्रोएशियाला गेले.

ट्रम्प यांच्यासोबत स्पष्टच बोलले - ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारताने केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईवर प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामासाठी कुठल्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी अथवा भारत-अमेरिका व्यापार कराराची कोणतीही भूमिका नव्हती.

ऑपरेशन सिंदूर आणि भारताची बूमिका - पाकिस्तानी दहशतनादी 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने 7 मे रोजी पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरला सुरूनात केली होती. या कारवाईत भारताने पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना निशाणा बनवले होते. यासंदर्भात टम्प यांना माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताची कारवाई अत्यंत "संतुलित, अचूक आणि तनावही वाढणार नाही," अशा प्रकारची होती. याशिवाय, भारताने नेहमीच दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

भारताने मध्यस्थीची शक्यता फेटाळली -ट्रम्प यांच्यासोबतच्या या संभाषणादरम्यान, मोदी म्हणाले, भारताने कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही कधी स्वीकारणार नाही. तत्पूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामासाठी अमेरिकेची भूमिका होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, भारताने हे दावे फेटाळून लावले आणि युद्धविराम दोन्ही देशांच्या परस्पर संमतीने झाला, ज्यात कुठल्याही बाह्य शक्तीची मध्यस्थी नव्हती, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाCanadaकॅनडा