नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. पटेल यांनी ४ सप्टेंबर २०१६ रोजी रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, नंतर त्यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता.
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 06:30 IST