शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

यूपीएससी टॉपर टीनाला अवघे ५२%

By admin | Updated: May 16, 2016 03:54 IST

टीना दाबी या २२ वर्षीय विद्यार्थिनीला अवघे ५२.४९ टक्के गुण मिळाले असून त्यातून यूपीएससीने मूल्यांकनासाठी लावलेले कठोर निकष उघड झाले

नवी दिल्ली : सनदी सेवा परीक्षेत देशभरातून अव्वल आलेल्या टीना दाबी या २२ वर्षीय विद्यार्थिनीला अवघे ५२.४९ टक्के गुण मिळाले असून त्यातून यूपीएससीने मूल्यांकनासाठी लावलेले कठोर निकष उघड झाले आहे.देशभरातील उच्च सनदी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षी प्राथमिक (प्रिलिमिनरी), मेन( मुख्य) आणि मुलाखती अशी तीन टप्प्यात ही परीक्षा पार पाडली जात असून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), इंडियन फॉरेन सर्व्हिस(आयएफएस) आणि इंडियन पोलीस सेवेसाठी (आयपीएस) निवड केली जाते. टीना ही दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजची पदवीधर असून तिने २०१५ च्या परीक्षेत एकूण १०६३ म्हणजे ५२.४९ टक्के गुण मिळविले आहेत. एकूण २०२५ गुणांपैकी १७५० मुख्य परीक्षा तर २७५ गुण मुलाखतीचे असतात. (वृत्तसंस्था)>एकूण १०८७ उमेदवारांची निवड६ मे रोजी घोषित झालेल्या निकालानुसार नियुक्तीसाठी शिफारस झालेले एकूण उमेदवार १०७८ असून त्यापैकी सर्वसाधारण श्रेणीतील ४९९, इतर मागासवर्गीय ३१४, अनुसूचित जाती-१७६, अनुसूचित जमाती-८९ यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या जम्मू-काश्मीरच्या अथार आमीर उल शफी खान यांनी १०१८ गुण (५०.२७ टक्के) तर तिसऱ्या क्रमांकावरील जसमीतसिंग संधू यांनी १०१४( ५०.०७ टक्के) गुण मिळविले आहेत. खान हे रेल्वे वाहतूक सेवेत अधिकारी आहेत. संधू ह्या महसूल सेवा (सीमा शुल्क आणि केंद्रीय अबकारी) अधिकारी आहेत.