शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:07 IST

beno zephine : बेनो जेफीन यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. आयुष्यात अनेक अडचणी आल्या तरी काही जण हार मानत नाहीत. आपल्या जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.  बेनो जेफीन यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बेनो या भारतातील पहिल्या दृष्टिहीन IFS अधिकारी आहेत. २०१५ मध्ये त्यांनी इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्वॉईन केली आहे. 

चेन्नईच्या रहिवासी असलेल्या बेनो जेफीन UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी त्यांचं वय अवघं २५ वर्षे होतं. त्यांनी इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट केलं होतं आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम केलं आहे. बेनो यांना जन्मापासूनच दिसत नव्हतं.

बेनो जेफीन यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला, त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहे. जन्मापासून दिसत नसलेल्या बेनो अभ्यासात अतिशय हुशार होत्या. सुरुवातीला ब्रेल लिपीत शिकल्यानंतर त्यांनी जॉब एक्सेस विथ स्पीच (JAWS) सॉफ्टवेअरचा वापर केला. या सॉफ्टवेअरच्या मदतीने जे लोक पाहू शकत नाहीत ते अभ्यास करू शकतात. बेनो यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आई-वडिलांनी आणि मित्रांनीही खूप मदत केली.

बेनो आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या पालकांना देतात. २०१३ मध्ये बेनो यांनी यूपीएससी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर जून २०१४ मध्ये त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली. ३४८ रँक मिळवला होता. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी