शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाचं फळ! सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर झाली IPS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:43 IST

डॉ. तरुणा कमल खूप प्रेरणादायी आहेत. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.

वैद्यकीय अभ्यास आणि यूपीएससी परीक्षा या दोन्हींमध्ये यशस्वी होणं सोपं नाही. परंतु आपल्याकडे अनेक यशस्वी अधिकाऱ्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यात करिअर करण्याऐवजी यूपीएससीची सरकारी नोकरी निवडली. हिमाचल प्रदेशातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणा कमल यांनीही असंच काहीसं केलं. त्यांनी वैंद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

डॉ. तरुणा कमल खूप प्रेरणादायी आहेत. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. तरुणा कमल यांनी २०२२ मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत २०३ वा रँक मिळवला. त्या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. त्या हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी आपलं मेडिकल करिअर सोडलं. आयएएस अधिकारी बनून त्यांनी सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण केलं.

तरुणा कमल यांचे वडील महापालिकेत सफाई कंत्राटदार असून आई नोर्मा देवी गृहिणी आहेत. तरुणा यांचा जन्म २६ जून १९९७ रोजी झाला. त्यांनी मॉडर्न पब्लिक स्कूल, रत्ती येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पालमपूर येथील जीसी नेगी कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्समधून वैद्यकीय पदवी घेतली. वेटरिनरी डॉक्टर म्हणून प्रशिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा विचार आला.

UPSC परीक्षेच्या तयारीसाठी चंदीगड येथील कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. तेव्हा त्यांचं वय २५ वर्षे होतं. तरुणा यांच्या म्हणण्यानुसार, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या अडचणी कमी झाल्या. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी