शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:40 IST

Jammu Kashmir Topper UPSC Result 2022: यूपीएससीच्या टॉपर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

यंदाचा यूपीएससीचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. या वर्षीच्या पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोर यंदाच्या UPSC परीक्षेत UPSC 2022 ची टॉपर ठरली आहे. नागरी सेवकांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींनी अव्वल स्थान मिळवले आहे. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.  933 उमेदवार नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या टॉपर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी वसीम अहमद भट याने सातवा क्रमांक पटकावला आहे. तर पूंछ जिल्ह्यातील प्रसनजीत कौर हिने परीक्षेत 11 वा क्रमांक पटकावला आहे. वसीम अहमद भटने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 225 वी एआयआर मिळवली होती. तो सध्या मुंबईत आहे. वसीम अहमदचा हा तिसरा प्रयत्न होता. त्याने श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.

24 वर्षीय वसीमला एंथ्रोपोलॉजीची पुस्तके वाचण्याची आणि साय-फाय टीव्ही शो पाहण्याची आवड आहे. एंथ्रोपोलॉजी हा त्याचा ऐच्छिक विषय होता. वसीमच्या या कामगिरीवर त्याच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच्या आईने सांगितले की, आमचे कुटुंब खूप आनंदी आहे. मी सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे. त्यांनी संपूर्ण जम्मू-काश्मीरचा अभिमान वाढवला आहे.

दुसरीकडे, 11वी रँक मिळवणाऱ्या 24 वर्षीय प्रसनजीत कौरने जम्मू विद्यापीठातून बीएससी आणि एमएससी केले आहे. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. पूंछ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कौर हिला मुलांना शिकवण्याची आवड आहे. प्राणीशास्त्र हा तिचा ऐच्छिक विषय होता.

तीन टप्प्यांत घेतली जाते परीक्षादरम्यान, यूपीएससीद्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यांत घेतली जाते, ज्यामध्ये उमेदवारांना प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यातून जावे लागते. या परीक्षेद्वारे, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यासह इतर सेवांच्या अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगJammu Kashmirजम्मू-काश्मीर