शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

UPSC Recruitment 2020: लोकसेवा आयोगाने काढली भरती; शुल्क २५ रुपये, पगार 7th पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:11 IST

UPSC Recruitment 2020, 7th Pay Commission Job: युपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यासाठी वयाची अट ही जास्तीतजास्त ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. आरक्षणात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.

UPSC Recruitment 2020, 7th Pay Commission Job: लोकसेवा आयोगाने सुप्रिटेंडेंट (प्रिंटिंग) आणि स्‍टेटिकल ऑफिसर पदांवर भरती काढली आहे. यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 

या जाहिरातीनुसार 01 सुप्रिटेंडेंट (प्रिंटिंग) आणि ३५ स्टॅटिकल अधिकारी पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in वर भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर आहे.

युपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यासाठी वयाची अट ही जास्तीतजास्त ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. आरक्षणात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी शिक्षणाची अट ही वेगवेगळी आहे. याबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

ओपन कॅटॅगरीच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५ रुपये आहे. तर आरक्षित कॅटॅगरीच्या उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. उमेदवारांची निवड नियमानुसार प्रोबेशनवर केली जाणार आहे. अधिकृत माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन पहावे. 

यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

एसबीआयमध्ये दोन दिवस शिल्लकएसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या sbi.co.in वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा.

एसबीआय़कडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील.

कुणाला करता येईल अर्जएसबीआय अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.

अशी होणार निवडएसबीआय अप्रेंटिस भरती २०२०२ साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या आधारावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारावर होईल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन लेखी परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली जाईल. ज्यामध्ये जनरल/फायनेंशियल अवेअरनेस, जनरल इंग्लिंश क्वांटिटेटिव्ह एप्टिट्युड आणि रीनजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्युड विषयांमधील एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. तसेच एकूण निर्धारित गुण १०० असतील. लेखी परीक्षेमध्ये ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक परीक्षेसाठी निमंत्रित केले जाईल. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी