शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

UPSCच्या निकालात महाराष्ट्रातील सृष्टी देशमुख पाचवी, कनिष्क कटारिया देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 22:43 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया-पहिला, अक्षत जैन-दुसरा, जुनैद अहमद-तिसरा, श्रवण कुमार-चौथा, सृष्टी देशमुख-पाचवी, शुभम गुप्ता- सहावा, कर्नाटी वरुणरेड्डी- सातवा, वैशाली सिंह- आठवा, गुंजन द्विवेदी नववी, तर तन्मय शर्मा दहावा आला आहे. तर तृप्ती धोडमिसे ही 16वी, वैभव गौंदवे हा 25वा आला आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे. पहिल्या 50मध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवला आहे.तर पुण्याच्या तृप्ती दोडमिसे या देशात 16व्या आल्या आहेत. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला, तर महिलांमधून सृष्टी देशमुख ही पहिली आली आहे. पुण्याच्या तृप्ती दोडमिसे दुस-या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे आई-वडील शिक्षक आहेत. त्या 10वी आणि 12वी या दोन्ही वर्षी बोर्डात अनुक्रमे 10व्या आणि 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर 2010मध्ये त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी)मधून प्रॉडक्शनची पदवी घेतली. सध्या त्या सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. लग्नानंतरही त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला होता. संसार, नोकरी, घर आदी सगळे सांभाळून त्यांनी यूपीएससीमध्ये 16वा क्रमांक पटकावला आहे.यूपीएससीची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2018मध्ये पार पडली. त्यानंतर फेब्रुवारी 2019मध्ये मुलाखती झाल्या. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यांपैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवली आहे. ग्रुप ए मधून 384, ग्रुप बी मधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.देशपातळीवरील पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात सृष्टी देशमुखने देशात पाचवे, पूजा मुळेने 11वे, तृप्ती दोडमिसेंनी 16वे, वैभव गौंदवेने 25वे, मनीषा आव्हाळेने 33वे, हेमंत पाटीलने 39वे तर ध्रुव मित्तलने 99वे स्थान प्राप्त केले. स्नेहल धायगुडेने 108, डॉ. श्रेणिक लोढाने 133, दिग्विजय पाटीलने 134, अमित काळेने 212, योगेश पाटीलने 231, नवजीवन पवार 316, सचिन पवार 444, मच्छिंद्र गलवे 640, अलोक सिंग 628, परमानंद दराडेने 615वे अशी रँक मिळवली आहे.चिकाटी अन् जिद्द सोडू नका‘लोकमत’शी बोलताना तृप्ती दोडमिसे म्हणाली, ‘‘यशाचा आनंद तर खूप आहे; पण त्यात मी एकटी नाही तर माझ्या सासर आणि माहेरच्या मंडळींचा आणि विशेषत: पती सुधाकर यांचा मोठा वाटा  आहे. त्यांच्या पाठिंब्यावर मी इथपर्यंत पोहोचू शकले. मी निराश होऊन अभ्यास सोडणा-या मुलांना एवढंच सांगेन, की तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडू नका; स्वप्न आपोआप तुमचा पाठलाग करत भेटायला येतील.’’ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आयएफएसमाजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना परराष्ट्र सेवेतून निवृत्त होऊन केवळ तीनच महिने उलटत असताना त्यांची कन्या पूजा हिने देशभरातून 11वा रँक पटकावून आयएफएस रँक मिळविली आहे. विशेष म्हणजे, तिच्या वाढदिवशी तिला ही अत्यंत आनंदाची बातमी समजली. परराष्ट्र खात्यात सेवा बजावण्याची मुळे  कुटुंबीयांची पंरपरा पूजाने कायम राखल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   ग्रुप ए मधून 384, ग्रुप बीमधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यातून जावे लागते. तसेच त्यांची खासगी मुलाखतही घेतली जाते. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग