शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मला यशाची पूर्ण खात्री होती", UPSC 2022 ची 'टॉपर' इशिता किशोरचं IAS बनण्याचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 15:50 IST

UPSC 2022 Topper Ishita Kishore : पहिला क्रमांक आल्यानंतर इशिता किशोरने आनंद व्यक्त केला. 

ishita kishore upsc 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल आज म्हणजेच मंगळवारी जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने पहिला क्रमांक पटकावला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारवारांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे. जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत इशिता किशोर (रोल क्र. ५८०९९८६) पहिल्या स्थानावर आहे. पहिला क्रमांक आल्यानंतर इशिताने आनंद व्यक्त केला असून यशाची पूर्ण खात्री होती असे म्हटले.

दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेत असलेल्या इशिताचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. "मला यशाची पूर्ण अपेक्षा होती, पण गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक मिळणे हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे", असे इशिताने सांगितले. इशिताच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा आहेत. 

इशिताची 'यशस्वी' झेपदरम्यान, नागरी सेवा परीक्षा २०२२ ची टॉपर इशिता किशोरने दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर एका खासगी कंपनीत जोखीम सल्लागार म्हणून नोकरी केली. मात्र, भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न तिला नागरी सेवा परीक्षेकडे घेऊन आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इशिताने नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी CRY, GAIL India Limited यांसह काही खासगी संस्थांमध्ये इंटर्नशिप देखील केली. यानंतर तिने क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातील भारत-चीन युवा शिष्टमंडळात प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. याशिवाय ती एमएनसीमध्ये विश्लेषक देखील बनली, त्यानंतर तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी केली.

पाहा संपूर्ण यादी1. इशिता किशोर2. गरिमा लोहिया3. उमा हर्थी एन4. स्मृती मिश्रा 5. मयूर हजारिका6. गेहाना नव्या जेम्स 7. वसीम अहमद भट8. अनिरुद्ध यादव9. कनिका गोयल 10. राहुल श्रीवास्तव 11. परसनजीत कौर 12. अभिनव सिवाच 13. विदुषी सिंग 14. कृतिका गोयल 15. स्वाती शर्मा 16. शिशिर कुमार सिंह 17. अविनाश कुमार18. सिद्धार्थ शुक्ला  19. लघिमा तिवारी20. अनुष्का शर्मा 21. शिवम यादव 22. जी व्ही एस पावनदत्ता 23. जी व्ही एस पावनदत्ता 

   

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNew Delhiनवी दिल्ली