शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

यूपीएससी परीक्षा वेळखाऊ; विद्यार्थ्यांचे आरोग्य येतेय धोक्यात, संसदीय समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 09:01 IST

भरतीचा कालावधी निश्चित करा; विलंबामुळे तरुणांना येतेय नैराश्य

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) १२ फेब्रुवारी २०२० मध्ये नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी केली. २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. म्हणजेच ही भरतीप्रक्रिया एक वर्ष, सात महिने आणि १२ दिवसांत पूर्ण झाली. २०१७-२०२१ पर्यंत सरासरी १५ महिन्यांत पूर्ण झाली. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक संसदीय स्थायी समितीने इतक्या लांबलचक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

प्रदीर्घ भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांचा वेळ वाया जातो, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. समितीने यूपीएससीला भरती प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याची शिफारस केली आहे. सुशीलकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही नागरी सेवा परीक्षेतील उमेदवारांच्या घसरत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

संसदीय समितीच्या शिफारशी तज्ज्ञ समिती स्थापन करा : ही भरतीप्रक्रिया इंग्रजी माध्यमाच्या शहरी उमेदवारांना आणि इंग्रजी नसलेल्या ग्रामीण उमेदवारांना समान संधी देत आहे की नाही हे तपासेल. खर्चाचे औचित्य सिद्ध करा : यूपीएससीने सल्ला शुल्काच्या नावाखाली विविध खटल्यांत १०.२५ कोटी रुपये खर्च केले. खर्चाचे समर्थन करण्याबरोबरच खर्च कमी करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

आघाडीच्या ५ राज्यांमध्ये आयएएस अधिकारीराज्य    मंजूर    कार्यरतउत्तर प्रदेश    ६५२    ५४८मध्य प्रदेश    ४३९    ३७०महाराष्ट्र    ४१५    ३३८तामिळनाडू    ३७६    ३२२बिहार    ३४२    २४८(देशात ६७४६ मंजूर पदे आहेत, तर ५२३१ कार्यरत आहेत.)(१ जानेवारी २०२१ पर्यंत, मंजूर आणि नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक अंतर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्वांत कमी अंतर सिक्कीममध्ये ९ आहे. मंजूर पदे ४८ आहेत, तर सक्रिय पदे ३९ आहेत.)

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग