शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

‘अदानी’वरून संसदेत गदारोळ, संसदीय समिती, सरन्यायाधीशांकडून चौकशी करा : विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 07:14 IST

Adani News: हिंडेनबर्ग अहवालामुळे केवळ एका आठवड्यात १०० अब्ज डॉलरचे नुकसान झालेल्या अदानी समूहामुळे गुरुवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला.

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालामुळे केवळ एका आठवड्यात १०० अब्ज डॉलरचे नुकसान झालेल्या अदानी समूहामुळे गुरुवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत गुरुवारी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदेत घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. त्यामुळे दुपारी दोननंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, सामान्य जनतेचे तसेच एसबीआय, एलआयसीचे हित लक्षात घेऊन या प्रश्नावर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सरन्यायाधीशांद्वारे चौकशी करण्याची मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करताच काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालावर चर्चा व्हावी आणि समूहाच्या व्यवसाय पद्धतीची चौकशी व्हावी, अशी त्यांची  मागणी होती.

एलआयसी, एसबीआय धोक्यात?काँग्रेस नेते खरगे यांनी नियम २६७ अन्वये एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांनी बाजारमूल्य गमावलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली होती. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी एलआयसी, एसबीआय आदींचे भांडवल धोक्यात आल्याच्या प्रकरणात चर्चेसाठी नोटीस दिली होती.

कंपन्यांना कर्ज देण्यासाठी दबाव का?खरगे म्हणाले की, सरकार दबाव आणून अशा कंपन्यांना कर्ज देण्यास का भाग पाडत आहे? या प्रकरणाच्या चौकशीसाठी संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली त्याची चौकशी व्हावी. तपासानंतर अहवाल रोज जनतेसमोर ठेवावा, जेणेकरून पारदर्शकता येईल व लोकांना आपला पैसा वाचेल याची खात्री पटेल.

मंत्र्यांची विनंती धुडकावली...अदानी प्रकरणावरून गोंधळ न थांबल्याने लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारी कामकाज सुरू होताच पुन्हा गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले.  मात्र, त्याानंतरही विरोधकांनी अदानी विषयावर चर्चा करण्याची मागणी लावून धरत गोंधळ घातला.

अर्थसंकल्प लबाडीने भरलेलाभाजप आपल्या काही नेत्यांच्या फायद्यासाठी जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि राष्ट्रीयीकृत बँकांतील लोकांच्या ठेवींचा वापर करत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. काही लोकांना फोन करून अनेक हजार कोटी (बाजारात) गुंतवण्यास सांगण्यात आले.’ केंद्रीय अर्थसंकल्प लबाडीने भरलेला आहे. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन केंद्र मोठ मोठे दावे करत आहे.    - ममता बॅनर्जी,    मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

टॅग्स :AdaniअदानीParliamentसंसद