शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:59 IST

Jammu & Kashmir assembly : दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.

जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी (7 नोव्हेंबर 2024) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आर्टिकल 370 वरून जबरदस्त गदारोळ बघायला मिळाला. एवढेच नाही, तर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. यावेळी पोस्टर्सदेखील फाडण्यात आले. दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.

नेमकं काय घडलं? -लांगेटचे अवामी इत्तेहाद पार्टीचे आमदार शेख खुर्शीद हे सभागृहात एक पोस्टर घेऊन पोहोचले होते. त्यांनी हे पोस्टर दाखवले. या पोस्टरवर आर्टिकल 370 बहाल करण्याची मागणी करण्यात आली होती. हे पोस्टर पाहून भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. भाजपचे आमदार भडकले आणि त्यांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावून घेतले. यानंतर हाणामारीही झाली. भाजप आमदारांनी हे पोस्टर फाडून टाकले. यानंतर भाजप आमदारांनी जबरदस्त गदारोळ केला."नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला" -भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र रैना म्हणाले, "आर्टिकल 370 आता जम्मू-काश्मीरमध्ये इतिहास बनले आहे. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानचे मनोबल वाढवत आहे. आर्टिकल 370 ने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि पाकिस्तानी मानसिकतेला जन्म दिला. अशा स्थितीत विधानसभेत 370 चा प्रस्ताव असंवैधानिक पद्धतीने आणणे आणि तो चोरांप्रमाणे घाईघाईने, गुपचूप मांडणे. यातून, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा बिघडवायची आहे, हेच दिसून येते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे."

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370MLAआमदारvidhan sabhaविधानसभा