शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:04 IST

UP Sambhal Committee report on jama masjid : 450 पानांच्या या अहवालात शाही जामा मशीद विरुद्ध हरिहर मंदिरासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दंगलीनंतर, एका न्यायिक समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केला. या अहवालात संभलमधील लोकसंख्या आणि डेमोग्राफीसह अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. 450 पानांच्या या अहवालात शाही जामा मशीद विरुद्ध हरिहर मंदिरासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.

संभल समितीच्या अहवालात लोकसंख्येसंदर्भातही खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिहर मंदिराच्या ऐतिहासिक अस्तित्वाचे पुरावेही सापडले आहेत. अहवालात सांगण्यात आले आहे की, येथे १९४७ मध्ये स्वातंत्र्यावेळी ४५% हिंदू होते, आता केवळ १५% ते २०% हिंदू उरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगली आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे संभलचे लोकसंख्याशास्त्र बदलले आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

अहवालात आणखी काय? -संभलमधील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर करण्यात आलेल्या सुमारे ४५० पानांच्या या अहवालात, केवळ २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचाराचाच उल्लेख नाही, तर संभलच्या इतिहासात झालेल्या दंगलींची संख्या आणि त्या दंगलींदरम्यान काय-काय घडले, याचीही माहिती देण्यात आली आहे.

अहवालानुसार, स्वातंत्र्यावेळी संभल नगर पालिकेच्या हद्दीत 55% मुस्लीम आणि 45% हिंदू राहत होते. मात्र आता हे प्रमाण आता जवळपास 85% मुस्लीम आणि 20% हिंदू असे झाले आहे. संभलमध्ये 1947, 1948, 1953, 1958, 1962, 1976, 1978, 1980, 1990, 1992, 1995, 2001 आणि 2019 मध्ये दंगली झाल्या होत्या. या अहवालानुसार, संभलमध्ये स्वातंत्र्यानंतर, एकूण 15 दंगली झाल्या.

संभलमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय : अहवाल -माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अहवालात म्हटले आहे की, संभल हे अनेक दहशतवादी संघटनांचे केंद्र बनले आहे. अल कायदा, हरकत-उल-मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांनी संभलमध्ये आपले हात-पाय पसरले आहेत.

संभल हिंसाचारासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या या न्यायिक आयोगात, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती देवेंद्र कुमार अरोरा, निवृत्त आयएएस अधिकारी अमित मोहन, निवृत्त आयपीएस अरविंद कुमार जैन यांचा समावेश होता. 24 नोव्हेबर 2024 रोजी संभलमध्ये हिंसाचार झाला होता. यानंतर, या न्यायिक समितीची स्थापना करण्यात आली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदूMuslimमुस्लीम