शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील मंदिरे करमुक्त, योगींच्या घोषणेनंतर घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:00 IST

Tax Relief for Ayodhya Temples : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे.

अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकारामुळे अयोध्येतील मंदिरांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या येथील मठ-मंदिरांवरील कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव अयोध्या महानगरपालिकेने मंजूर केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे. मठ- मंदिरांना आता फक्त प्रतिकात्मक कर द्यावा लागेल. ज्या सर्व मठ, मंदिर आणि आश्रमांचा कर माफ करण्यात आला आहे, ते व्यावसायिक उपयोग करत नाहीत. तसेच, मंदिरांवर असलेला थकित कर सुद्धा माफ करण्यात आला आहे.  

यासंदर्भात उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. सुरेश कुमार खन्ना यांनी म्हटले आहे की, "अयोध्येत मठ-मंदिर कर, थकित कर सुद्धा माफ".  

मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणादरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की, मंदिर आणि धर्मशाळांचा कर माफ केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता महानगर पालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. महानगर पालिकेच्या महापौरांनी सांगितले की, नगरसेवक अर्जुनदार आणि रमेशदास यांच्या प्रस्तावावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिरांचे थकित कर सुद्धा माफ केले आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश