शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 18:26 IST

"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल."

जेव्हा भगवान श्रीकृष्णांची स्मृती आपल्या समोर येते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या एका हातात बासरी आहे, तर दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र आहे. केवळ बासरीने काम चालणार नाही. तर सुरक्षिततेसाठी सुदर्शनही आवश्यक आहे. तसेच, पाकिस्तान हा 'नासूर' आहे; तो माणुसकीचा 'कॅन्सर' आहे, त्याचा उपचार जगातील शक्तींना वेळेतच करावा लागेल, असे उत्तर प्रदेशची मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (16 सप्टेंबर) पश्चिम त्रिपुरातील बराकथल येथे सिद्धेश्वरी मंदिरच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते. 

योगी म्हणाले, अयोध्या, मथुरा आणि काशी हे तीन सनातन हिंदू धर्माचे महत्वाचे स्तंभ आहेत. मानबिंदू आहेत. जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल.

उत्तर प्रदेशात डबल इंजिनचे सरकार आले, सुरक्षिततेचे वातावरण मिळाले. दंगलखोरांना बुलडोजरही दिले गेले. याच बरोबर भक्तांसाठी श्री राम मंदिराचेही काम करण्यात आले."

काँग्रेसवर निशाणा -काँग्रेस पक्षावर हल्ला चढवत योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी देशाची फाळणी मान्य केली. आरएसएसने 1925 मध्येच धोका ओळखला होता. त्यांना माहीत होते की, आपण याच पद्धतीने काँग्रेसकडून चालवल्या जात असलेल्या संधीवर चालत राहिलो, तर ते देशाचे तुकडे करतील. जो विचार त्यांनी केला होता तो खरा ठरला आणि देशाचे तुकडे झाले.

तुमच्या शक्तीचा परिचय सर्वांना असायला हवा - योगी म्हणाले, "जर आपण धर्माचे रक्षण कराल, तर धर्म आपले रक्षण करेल, पण स्वार्थासाठी त्याचा वापर कराल तर तेच हाल होतील. आम्ही सशक्त भारतासाठी काम करत आहोत. त्रिपुरा स्वतंत्र राहिला कारण येथील राजाने आपल्या सामर्थ्याचा परिचय करून दिला. जो कोणी आपली शक्ती गमावून शत्रूला समजून घेणण्याची चूक करेल, त्याचे हाल आजच्या बांगलादेश प्रमाणे होतील." 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसBJPभाजपा