शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Akhilesh Yadav : अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार? सध्या आहेत आझमगडचे खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:47 IST

UP Assembly Election 2022 : अखिलेश यादव सध्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

लखनऊ : भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022)  गोरखपूर मतदारसंघातून रिंगणात उतरवल्यानंतर आता समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav will contest in UP Assembly Elections) यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

अखिलेश यादव सध्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2000 मध्ये पहिल्यांदा कन्नौज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून अखिलेश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत पोहोचले होते. 2004 आणि 2009 च्या सार्वजनिक निवडणुकीतही ते कन्नौजमधून विजयी झाले आणि लोकसभेत पोहोचले होते. 2012 मध्ये अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना कन्नौज लोकसभा मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर अखिलेश यादव विधान परिषदेचे सदस्य झाले होते.

अखिलेश यादव कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार?अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत, मात्र समाजवादी पार्टीकडून अद्याप जागा जाहीर करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अखिलेश यादव पूर्वांचल किंवा मध्य उत्तर प्रदेशमधील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. तसेच, अखिलेश यादव आझमगड किंवा गाझीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

सात टप्प्यात विधानसभा निवडणूकदरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२