शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: पत्नी स्वाती सिंह यांचे तिकीट भाजपाने कापल्याने पती दयाशंकर सिंह यांनी व्यक्त केला आनंद, दिली अशी प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 12:46 IST

UP Assembly Election 2022: भारतीय जनता पक्षाने लखनौमधील सरोजिनीनगर सीटवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला आहे. या जागेसाठी आमने सामने आलेले भाजपा नेते दयाशंकर सिंह आणि त्यांच्या पत्नी स्वाती सिंह या दोघांनाही तिकीट नाकारत तिसऱ्याच व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ - भारतीय जनता पक्षाने लखनौमधील सरोजिनीनगर सीटवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला आहे. या जागेसाठी आमने सामने आलेले भाजपा नेते दयाशंकर सिंह आणि त्यांच्या पत्नी स्वाती सिंह या दोघांनाही तिकीट नाकारत तिसऱ्याच व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपान सरोजिनीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राजेश्वर सिंह यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दयाशंकर सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राजेश्वर सिंह यांना विजयी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. दयाशंकर सिंह यांनी सांगितले की, राजेश्वर सिंह हेसुद्धा बलियामधील आहेत. मीपण तिथलाच आहे. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये कौटुंबिक संबंध आहेत. 

दरम्यान, कौटुंबिक मतभेदांमुळे तिकीट कापले गेल्याची बाब दयाशंकर सिंह यांनी फेटाळली आहे. आम्हा पती-पत्नीमधील भांडणामुळे राजेश्वर सिंह यांना उमेदवारी देण्यात आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पक्ष जो विजय मिळवून देऊ शकतो, असे वाटते त्याला तिकीट दिले जाते. राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने आमच्यासाठीही काहीतरी चांगला निर्णय घेतला असेल. या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांची तिकीटं कापण्यात आली आहेत, त्यामुळे त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही, असंही दयाशंकर सिंह म्हणाले.

तत्पूर्वी दयाशंकर सिंह यांच्या पत्नी आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्या एका व्यक्तीसोबत बोलताना आपली व्यथा मांडताना ऐकू येत होत्या. तसेच या संभाषणामध्ये त्यांनी पती दयाशंकर सिंह यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. स्वाती सिंह यांचे म्हणणे ऐकल्यावर समोरील व्यक्ती स्वाती सिंह यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करताना दिसतो. तो सांगतो की तुम्ही स्वत:च्या बळावर राजकीय कारकीर्द घडवली आहे. त्यात पतीचं काहीही योगदान नाही. दरम्यान, लखनौमधील सरोजिनीनगर मतरादसंघामधून मंत्री स्वाती सिंह यांच्यासह त्यांचे पती दयाशंकर सिंह यांनीही दावेदारी केली होती. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यावी याबबत पक्षासमोर पेच निर्माण झाला होता.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPoliticsराजकारण