शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचं घणाघाती भाषण, म्हणाले 'उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:17 IST

UP Assembly Election 2022 : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचा बालेकिल्ला असलेल्या ऊत्तर प्रदेशमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख Aditya Thackeray यांनी झंझावाती सभा घेतली.

लखनौ - केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधातशिवसेना कमालीची आक्रमक झालेली आहे. त्यातच आता जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे अशा ठिकाणी शिवसेनेकडून भाजपाला आव्हान देण्याची रणनीती आखली जात आहे. काही दिवसांपूर्वीच दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानंतर शिवसेनेने गोव्यातही भाजपाच्या सत्तेला आव्हान दिले होते. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्येही भाजपाविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी झंझावाती सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात घणाघाती भाषण करत उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असा विश्वास व्यक्त केला. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेशात परिवर्तनाची लाट आहे. उत्तर प्रदेशात यावेळी सत्ताबदल होणार आहे. ज्या आशेने भाजपाला सत्ता दिली होती. त्या अपेक्षांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता राज्यात परिवर्तन झाले पाहिजे. मोठे बहुमत असूनही भाजपाला जनतेच्या स्वप्नांची पूर्तता होऊ शकली नाही. पाच वर्षांत केवळ दंग्याचीच चर्चा झाली. भाजपाने केवळ घाबरवण्याची भाषा केली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचे राजकारण पाहा. राजकारण करा तेव्हा ते लोकांसाठी करा, समाजसेवेसाठी करा, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या रंगाचा रंग लाल आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. त्यावेळी आम्ही सत्तेत होतो, याचं दु:ख वाटतं, अशी खंतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशमधील सध्याचे मुख्यमंत्री जे काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री बनतील. ते मुंबईत आले की मोठमोठ्या जाहिराती देतात. एवढी गुंतवणूक आली, एवढा विकास झाला, एवढे रस्ते बनले, असे दावे करतात. मात्र रोजगार वाढले आहेत की बेरोजगारी वाढली वाढली आहे, महिलांचा सन्मान वाढलाय की अन्याय वाढलाय, हेच आम्हाला बदलायचं आहे. त्यामुळेच परिवर्तनाची लाट येथे आली पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२