शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

Unnao Rape Case: उन्नाव पीडितेच्या वडिलांची हत्या; सेंगरला १0 वर्षे जेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 01:30 IST

पीडिता कुटुंबातील काही सदस्य आणि वकिलांसमवेत कारने प्रवास करीत असताना जुलै २०१९ मध्ये एका ट्रकने कारला ठोकरले.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कारपीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बलात्कारपीडितेचे वडील न्यायालयीन कोठडीत असताना ९ एप्रिल २०१८ रोजी मृत्यू झाला होता. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांचे भाऊ अतुल सिंह सेंगरला पीडितेच्या कुटुंबियास भरपाईपोटी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

४ मार्च रोजी कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले होते. या खटल्यात कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरसह सात जणांना दोषी ठरविले होते. तथापि, कुलदीप सिंह सेंगरने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी आपला सहभाग असल्याचा इन्कार केला होता, तसेच आपण काहीही गैर केले नसल्याचे म्हटले होते. बलात्काराच्या एका अन्य खटल्यात कुलदीप सेंगरला मागच्या वर्षी २० डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली होती.

२०१७ मध्ये सेंगरने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. कुलदीप सेंगरसह माखी पोलीस ठाणे अधिकारी अशोकसिंह भदौरिया, तत्कालीन पोलीस निरीक्षक के.पी. सिंह, विनीत मिश्रा, बिरेंद्र सिंह, शशि प्रताप सिंह, सुमन सिंह आणि सेंगरचा भाऊ अतुल यांना भा.दं.वि. कलम १२० बी आणि अन्य कलमांतहत दोषी ठरविण्यात आले. कोर्टाने संशयचा फायदा देत कॉन्स्टेबल आमिर खान, शैलेंद्र सिंह, रमण शरण सिंह आणि शरदवीर सिंह यांची सुटका केली.

पीडिता कुटुंबातील काही सदस्य आणि वकिलांसमवेत कारने प्रवास करीत असताना जुलै २०१९ मध्ये एका ट्रकने कारला ठोकरले. या दुर्घटनेत पीडितेच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. पीडितेला लखनौतील एका इस्पितळातून विमानाने दिल्लीतील एम्स इस्पितळात दाखल करणयात आले होते. पीडिता सध्या आरपीपीएफच्या सुरक्षेत आहे.एप्रिल २0१८ मध्ये नेमके काय झाले होते?३ एप्रिल २०१८ रोजी पीडितेचे वडील आणि शशि प्रताप सिंह यांच्यात वाद झाला होता. पीडितेचे वडील सहकाऱ्यांसोबत गावी परतत असताना त्यांनी सिंह यांना आपल्या वाहनातून सोडण्याची विनंती केली होती. सिंहने नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. सिंहने साथीदारांना बोलावले. त्यानंतर कुलदीप सेंगरचा भाऊ अतुल इतर लोकांसोबत घटनास्थळी पोहोचला आणि पीडितेच्या वडिलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन पीडितेच्या वडिलांसह इतरांना अटक करण्यात आली होती, असे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले होते.

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण