शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उन्नाव बलात्कार प्रकरण : सीबीआयच्या आरोपपत्रात भाजपा आमदारासह इतरांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 9:27 PM

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं आज भाजपा आमदार कुलदीप सेन सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे.

लखनऊ- उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं आज भाजपा आमदार कुलदीप सेन सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे. कुलदीपनं पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता.उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखलदेखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं.नेमके काय आहे प्रकरण?  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.  

आयोगाची सरकारला नोटीसराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंह व अतुलसिंह या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.