शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावली जाते बोली - साक्षी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 16:29 IST

sakshi maharaj : शनिवारी फिरोजाबाद येथे एका कार्यक्रमात खासदार साक्षी महाराज उपस्थित होते.

ठळक मुद्देयोगी सरकारने आणलेल्या लव्ह जिहाद कायद्याचे साक्षी महाराज यांनी कौतुक केले आहे.

फिरोजाबाद : देशातील इतर राज्यांप्रमाणेच योगी सरकारनेही उत्तर प्रदेशात 'लव्ह जिहाद'विरूद्ध कायदा आणण्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. दरम्यान, याविषयी बोलताना लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींची बोली लावली जाते, असे विधान उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. 

शनिवारी फिरोजाबाद येथे एका कार्यक्रमात खासदार साक्षी महाराज उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, "लव्ह हा एक चांगला शब्द आहे. लव्ह प्रेम विवाहाची परंपरा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून सुरू आहे. यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी जिहाद जोडला जातो, त्यावेळी ते विषबाधा होते. लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींना खोटी नावे ठेवून फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते." 

याचबरोबर, प्रेम विवाह 99 टक्के यशस्वी असतात, पण लव्ह जिहाद 99 टक्के अपयशी ठरतात. तर लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात. जिथे कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत 11 लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किंमती निश्चित आहेत. तसेच, मदरसे व मशिदीमधून हे चालविले जाते, असा दावा साक्षी महाराज यांनी केला आहे. याशिवाय, योगी सरकारने आणलेल्या लव्ह जिहाद कायद्याचे त्यांनी कौतुक केले आहे.

दुसरीकडे, योगी सरकारच्या लव्ह जिहाद संबंधित धर्म परिवर्तन अशा अध्यादेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हा अध्यादेश नैतिक आणि घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर असल्याचे सांगत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

50 हजार रुपयांपर्यंत दंडउत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी लग्नासाठी बेकायदेशीर धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. याआधी राज्य सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लग्नासाठी फसवणूक करून धर्मांतर केल्या जाणाऱ्या घटना थांबविण्याच्या कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.'हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर झाल्यानंतर 15 ते 50 हजारांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर लग्नाच्या नावावर धर्मांतर करणे बेकायदेशीर घोषित केले आहे. तसेच, जर कोणताही गट धर्मांतर करीत असेल तर त्याला 3 ते 10 वर्षांची शिक्षा होईल. 

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपाLove Jihadलव्ह जिहाद