शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित मुलीला लग्नाचा खर्च पालकांकडे मागण्याचा कायदेशीर अधिकार; हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 09:46 IST

उच्च न्यायालयानं बदलला कुटुंब न्यायालयाचा निकाल; सहा वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला यश

बिलासपूर: अविवाहित तरुणीनं लग्नाच्या खर्चासाठी आपल्याच पालकांविरोधात केलेल्या याचिकेवर छत्तीसगडमधील बिलासपूर उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. अविवाहित तरुणी तिच्या लग्नात होणाऱ्या खर्चासाठी पालकांवर दावा करू शकते, असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गौतम भादुडी आणि न्यायमूर्ती संजय अग्रवाल यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. 

हिंदू दत्तक आणि देखभाल अधिनियमाच्या अंतर्गत आदेश देत असल्याचं न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. उच्च न्यायालयानं दुर्ग कुटुंब न्यायालयानं निकाल बदलला. या प्रकरणी पुनर्विचार करून निर्णय देण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. या निकालाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

नेमकं प्रकरण काय?दुर्ग जिल्ह्यातल्या भिलाई स्टिल प्लांटमध्ये काम करणाऱ्या भानुराम यांच्या मुलीनं २०१६ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वडिलांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ७५ लाखांपैकी २५ लाख रुपये मिळावेत यासाठी तिनं याचिका केली होती. मात्र याचिका योग्य नसल्याचं म्हणत जानेवारी २०१६ मध्ये न्यायालयानं ती फेटाळून लावली.

हिंदू दत्तक आणि देखभाल अधिनियमाच्या अंतर्गत तरुणी कुटुंब न्यायालयात अर्ज करू शकते, असं उच्च न्यायालयानं म्हटलं. त्यानंतर तरुणीनं दुर्ग कुटुंब न्यायालयात अपील केलं. तिनं वडिलांकडे लग्नासाठी २५ लाखांची मागणी केली. फेब्रुवारी २०१६ मध्ये कुटुंब न्यायालयानं मुलीची मागणी फेटाळली. त्यानंतर तरुणीनं या निकालाला पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

६ वर्षांनंतर महत्त्वाचा निकालबिलासपूर उच्च न्यायालयात तरुणीनं ६ वर्षे कायदेशीर लढा दिला. त्यानंतर न्यायालयानं तिच्या बाजूनं निकाल दिला. तरुणीनं तिच्या लग्नात होणाऱ्या खर्चासाठी २५ लाखांची मागणी केली होती. वडिलांना निवृत्तीनंतर ७५ लाख मिळणार आहेत. त्यापैकी २५ लाख रुपये मला मिळावेत अशी मागणी तरुणीनं केली. उच्च न्यायालयानं तरुणीच्या बाजूनं निकाल देत कुटुंब न्यायालयाचा निकाल बदलला.

टॅग्स :marriageलग्न