शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock 3: राज्यांतर्गत, आंतरराज्य प्रवासावर बंधने नकोत; केंद्राच्या राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:32 IST

केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिले आहे. त्यात प्रवासी व मालवाहतुकीबद्दल सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली : राज्यांतर्गत, आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीवर कोणतीही बंधने घालण्यात येऊ नयेत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यासंदर्भात राज्यांना एका पत्राद्वारे केल्या आहेत.

केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिले आहे. त्यात प्रवासी व मालवाहतुकीबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विविध राज्यांतून तिथे होणारी प्रवासी व मालवाहतूक यांच्यासाठीही वेगळी परवानगी वा इ-परमीट यांची आवश्यकता नसेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बहुतांश राज्यांनी जिल्हांतर्गत तसेच दोन जिल्ह्यांत वा दोन राज्यांतील प्रवासी व मालवाहतुकीवर काही बंधने घातली होती. प्रवाशांना इ-पास सक्तीचे केले होते. त्याची दखल घेत आता अशा बंधनांची आवश्यकता नाही असे गृह मंत्रालयाने राज्यांना कळवले आहे.शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंदचशाळा, महाविद्यालये, चित्रपगृह, मेट्रो ट्रेन पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहाणार हे निश्चित आहे. मात्र काही राज्यांनी शाळा, महाविद्यालये सप्टेंबरपासून सुरू करण्यास अनुकूलता दर्शविलेली आहे.बंधनांमुळे प्रतिकूल परिणामया पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीवर राज्यांनी घातलेल्या बंधनांमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा, अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीवरही परिणाम होत आहे. अनलॉकच्या तिसºया टप्प्याच्या १ आॅगस्टपासून अमलात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व राज्यांनी काटेकोर पालन करायला हवे.महाराष्ट्रात मात्र सध्या ई-पासची सक्ती कायमकेंद्र सरकारने आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज नाही, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले असले तरी महाराष्ट्रात राज्य शासन नव्याने आदेश काढत नाही तोवर ई-पासची सक्ती कायम राहणार आहे. केंद्राच्या आदेशाने राज्यात ई-पासची सक्ती रद्द केलेली नाही.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकState Governmentराज्य सरकार