शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

१ ऑगस्टपासून अनलॉक-३; निर्बंध आणखी शिथिल होणार; जाणून घ्या काय-काय उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:38 IST

शाळा, कॉलेज, मेट्रो बंदच : चित्रपटगृहे, जीम सुरू करण्याचा विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊनमधील निर्र्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची मुदत येत्या ३१ जुलैला संपणार आहे. त्यामुळे १  ऑगस्टपासून अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू करताना काही अटींवर चित्रपटगृहे, जिम सुरू करण्यास परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, मेट्रो रेल्वेसेवा बंदच राहणार असल्याचे कळते. सूत्रांनी सांगितले की, शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी कायाविषयी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने विविध राज्यांशी याआधीच चर्चा सुरू केली होती. केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिता कारवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही पार पडली होती.

केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल यांनी याआधी सांगितले होते की, शाळा पुन्हा सुरू कराव्यात का याविषयी केंद्र सरकार पालकांची मतेही विचारात घेणार आहे. त्यानुसार चाचपणी केली असता पालकही शाळा सध्या सुरू करू नका, याच मताचे आहेत अशीमाहिती मिळते. जिम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता असून त्यामुळे व्यायामप्रेमींना व आरोग्य तंदुरुस्त ठेवू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

थिएटरमध्ये २५ टक्केच प्रेक्षक?च्देशभरातील चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने अनुकूल अभिप्राय दिला आहे. मात्र त्यासाठी चित्रपटगृह, मल्टिप्लेक्सच्या मालकांशी सरकार चर्चा करत आहे.च्चित्रपटगृहाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या प्रेक्षकांनाच चित्रपट खेळासाठी प्रवेश देण्यास मालकमंडळी राजी आहेत. कमी प्रेक्षकसंख्येमुळे फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जाईल, असे त्यांचे मत आहे. परंतु चित्रपटगृह, मल्टिप्लेक्समध्ये फक्त २५ टक्केट प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, असे केंंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मत आहे.लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या तिसºया टप्प्यात केंंद्र सरकारने काही निर्णय जाहीर करणार आहे. त्यासाठी केंंद्र्रीय गृह खात्यानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र विविध राज्य सरकारांनीच त्यांच्याकडील कोरोनाविषयक स्थिती पाहूनच केंंद्राच्या निर्णयांची कितपत अंमलबजावणी करायची हे ठरवतील.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाविविध राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्रांशी टप्प्याटप्प्याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. आतापर्यंत लॉकडाऊन लागू करतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या त्या वेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकNarendra Modiनरेंद्र मोदी