शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

Unlock 1: कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 1:38 PM

अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.

नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात २ लाख ५० हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. १ जूनपासून केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अनलॉक १ सुरु केलं आहे. मात्र देशात कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढत असल्याचं दिसून येत आहे.

अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारने याबाबत नवी गाईडलाईन जारी केली आहे. या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार यापुढे ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाही अशांनाच कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे.

काय आहेत केंद्र सरकारचे नवीन नियम

  • सर्दी / खोकला किंवा ताप असल्यास त्या कर्मचाऱ्याने घरीच राहावं.
  • कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घरुनच काम करावं. जोपर्यंत कन्टेन्मेंट झोन हटत नाही तोवर अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊ नये
  • एका दिवसात २० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू नये, यासाठी रोस्टर बनवण्यात यावं. बाकी कर्मचाऱ्यांनी घरुन काम करावं.
  • जर एका कॅबिनमध्ये दोन अधिकारी असतील तर त्यांनी एक दिवसआड कार्यालयात यावं.
  • पूर्ण वेळ मास्क लावणे आवश्यक आहे. जे मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
  • सोशल डिस्टेंसिंगच पालन करणे गरजेचे
  • अधिकाऱ्यांनी स्वत:च्या कॅम्प्युटरची सफाई स्वत: करावी
  • शक्य तेवढे दूर राहून बैठका आणि कामकाज करावं.

अनलॉक १ दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे तर आतापर्यंत ७ हजार ४६६ लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासात कोरोनाचे ९ हजार ९८७ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी