शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात सफाई कर्मचारी महिलांना मागितले मासिक पाळीचे फोटोसह पुरावे; कोर्ट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 09:57 IST

एखादी महिला कर्मचारी मासिक पाळीमुळे ओझे किंवा कष्टाची कामे करू शकत नसेल तर दुसरे कर्मचारी या कामासाठी नेमले जाऊ शकले असते, असे कोर्टाने सुनावले.

नवी दिल्ली: हरयाणातील महर्षी दयानंद विद्यापीठातील सफाई महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी सुरू असल्याचे सचित्र पुरावे मागितल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि इतर संबंधित विभागांना नोटिसा बजावून म्हणणे मागवले. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना व न्या. आर. महादेवन यांच्या पीठाने या नोटिसा बजावल्या आहेत.

या संदर्भात न्या. नागरत्ना म्हणाले, 'यातून या लोकांची मानसिकता स्पष्ट होते. कर्नाटकात मासिक पाळीसाठी सुटी दिली जाते. हा प्रकार वाचल्यावर मनात विचार आला की आता सुटी देण्यासाठी हे लोक असे पुरावे मागणार का?'

काय आहे याचिका?

बार असोसिएशनच्या याचिकेत महिलांना कामकाजाच्या ठिकाणी, शैक्षणिक संस्थांमध्ये मासिक पाळी किंवा स्त्रीरोग समस्यांबाबतची गोपनीयता, वैयक्तिक प्रतिष्ठा तसेच त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेच्या रक्षणार्थ कठोर व बंधनकारक निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

न्यायालयाने सुनावले...

एखादी महिला कर्मचारी मासिक पाळीमुळे ओझे किंवा कष्टाची कामे करू शकत नसेल तर दुसरे कर्मचारी या कामासाठी नेमले जाऊ शकले असते, असे कोर्टाने सुनावले. बार असोसिएशनचे अध्यक्ष व विधिज्ञ विकाससिंह यांनी नमूद केले की, असे प्रकारे अनेक राज्यांत घडत आहेत. त्याकरिता संपूर्ण देशासाव मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे.तक्रार काय?

महिला सफाई कामगारांना हरियाणातील या विद्यापीठांत मासिक पाळी सुरू असल्याचा पुरावा म्हणून संबंधित अवयवांसह सॅनिटरी पॅडची छायाचित्रे मागितली गेली.

कारवाई काय?पोलिसांनी महर्षी दयानंद विद्यापीठाशी संबंधित तिघांवर ३१ ऑक्टोबर रोजी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोन पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले होते. हरियाणाचे राज्यपाल असीमकुमार घोष विद्यापीठ परिसराचा दौरा करण्यापूर्वी २६ ऑक्टोबरला सफाई कामगारांबाबत हा प्रकार घडला होता. याबाबत तीन महिलांनी तक्रार केली होती. मासिक पाळी सुरू असताना अशक्तपणा जाणवत होता. तरीही दोन पर्यवेक्षकांनी बळजबरी करून सफाईचे काम करून घेतल्याची ही तक्रार होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय