शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अमेरिकेच्या १९ चंद्रमोहिमा अयशस्वी; रशिया, अमेरिका, चीनलाच मिळाले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 02:45 IST

इस्रायलचे अंतराळयानही उतरू शकले नव्हते

पुणे : अमेरिकेच्या १९ तर रशियाच्या ५ चंद्रमोहिमा अयशस्वी झाल्यावरच त्यांना चंद्रावर पोहोचण्यात यश मिळाले होते. १३ सप्टेंबर १९६६ रोजी रशियाला चंद्रावर अंतराळयान उतरविण्यात पहिले यश मिळाले होते. रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह १९५७ मध्ये प्रथम अवकाशात पाठविला. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे अपोलो ११ हे यान चंद्रावर पोहोचले. चंद्रावरील पहिली मोहीम १७ आॅगस्ट १९५८ अमेरिकेने काढली. मात्र, पायोनिअर ० हे यान पृथ्वीपासून १६ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर गीअरबॉक्समधील बिघाडामुळे कोसळले. २० जुलै १९६९ रोजी मानवी इतिहासातील चमत्कार घडला. नील आर्मस्ट्रॉँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.

17 ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावरील पहिली मोहीम अमेरिकेने काढली. मात्र, पायोनिअर ० हे यान पृथ्वीपासून १६ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर कोसळले. अमेरिकेने १९५८ च्या ऑक्टोबर महिन्यात पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पायोनिअर-१ हे अंतराळयान पृथ्वीपासून १ लाख १३ हजार ८०० किलोमीटरपर्यंंत जाऊ शकले. मात्र, दुसऱ्या टप्प्यात यान लवकर विलग झाल्याने कोसळले.

08 नोव्हेंबरला पुन्हा अमेरिकेने पायोनिअर- २ हे अंतराळयान पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी १५५० किलोमीटर अंतरावर गेल्यावर तिसºया टप्यात कोसळले. रशियाने ४ डिसेंबर १९६८ रोजी पुन्हा लुना ई- १ क्रमांक ३ पाठविले. परंतु, ते उडूच शकले नाही.06 डिसेंबर रोजी अमेरिकेने पुन्हा पायोनिअर-३ अंतराळयानाचे प्रक्षेपण केले. मात्र, १ लाख २ हजार ३६० किलोमीटर अंतरावर ते कोसळले.

रशियाने २ जानेवारी १९५९ रोजी मेचटा हे अंतराळयान सोडले. मात्र, चंद्रापासून ५९९५ किलोमीटर अंतरावर असताना रॉकेटमधील बिघाडामुळे ते कोसळले. 03 मार्च १९५९ रोजी पायोनिअर-४ हे अमेरिकेचे अंतराळयान प्रथमच पृथ्वीची कक्षा भेदण्यता यशस्वी ठरले. परंतु, दुसºया टप्प्यातील बिघाडामुळे ते कोसळले.12 सप्टेंबर १९५९ रोजी रशियाचे लुना २ हे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यात प्रथमच यशस्वी झाले. रशियाने ४ आॅक्टोबर १९५९ रोजी पुन्हा लुना -३ अंतराळयान यशस्वीपणे चंद्रावर पाठविले. चंद्राची पहिली प्रतिमा मिळाली. 25 सप्टेंबर १९६०, १५ डिसेंबर १९६०, २६ जानेवारी १९६२ रोजी अमेरिकेनेही मोहिमा काढल्या. परंतु, त्या अयशस्वी झाल्या. २३ एप्रिल १९६२ रोजी रेंजर- ५ हे अंतराळयान चंदापर्यंत पोहोचले. परंतु, चंद्रावर कोसळले.

अमेरिकेने २८ जुलै १९६४ रोजी प्रथमच चंद्रावर मोहीम काढली. रेंजर-७ हे अंतराळयान चंद्रावर यशस्वीपणे पोहाचले. पुन्हा १७ फेब्रुवारी रोजीची अमेरिकेची मोहीम यशस्वी ठरली. 18 जुलै १९६५ रोजी रशियाने काढलेली मोहीम यशस्वी ठरली. ३१ जानेवारी १९६६ रोजी रशियाचे लुना- ९हे अंतराळयान यशस्वीपणे झेपावले. ६ फेब्रुवारी रोजी ते चंद्रावर यशस्वीपणे उतरले. अंतराळाच्या इतिहासात चंद्रावर उतरण्याचा पहिला मान रशियाने मिळविला.

31 मार्च १९६६ रोजी रशियाने पाठविलेले लुना-१० अंतराळयान यशस्वीपणे झेपावले आणि चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरही झाले.३० मे १९६६ रोजी अमेरिकेचे सर्व्हेयर-१ हे अंतराळयान प्रथमच चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरले.04 जानेवारी १९५९ रोजी पहिली यशस्वी मोहीम यूएसएसआरची लुना १ ही होती. हे यश सहाव्या मोहिमेत मिळाले. त्यानंतर जुलै १९६४ मध्ये अमेरिकेने रेंजर ७ मिशन सुरू केले. रशियाकडून जानेवारी १९६६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या लुना ९ मिशनने प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला आणि यासोबत प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावरील छायाचित्र मिळाले.

22 आॅगस्ट १९६६ रोजी रशियाने सोडलेले लुना-१२ हे अंतराळयान यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत स्थिरावले. रशियानेच २१ डिसेंबर १९६६ रोजी लुना-१३ हे अंतराळयान चंद्रावर पाठविले. ते यशस्वीपणे तेथे उतरले आणि चंद्रावरील मातीचा अभ्यासही केला.अमेरिकेनेही ५ फेब्रुवारी १९६७ रोजी लुनर आॅरबिटर ३ हे अंतराळयान पाठविले. 14 सप्टेंबर १९६८ रोजी रशियाने झोंड- ५ हे अंतराळयान पाठवून इतिहास रचला. त्यामध्ये दोन जीवंत कासवे होती.  21 आॅक्टोबर २००८ रोजी भारताची चांद्रयान १ ही मोहीम यशस्वी झाली. चंद्रावर बर्फाच्या स्वरुपातील पाण्याचा शोध लावला.

२३ आॅक्टोबर २०१३ रोजी चीनने सोडलेल्या चॅँग ५ या अंतराळयानाने चंद्रावरचे नमुने आणले. 07 डिसेंबर २०१८ रोजी चीनने चॅँग ४ हे अंतराळयान सोडले. ते ३ जानेवारी २०१९ रोजी चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यातील युटू-२ ही बग्गी चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करीतआहे.12 आॅगस्ट १९७८ रोजी अमेरिकेनेही आयएसइइ-३ हे अंतराळयान यशस्वीपणे पाठविले  २४ जानेवारी १९९० रोजी हायटेन हे अंतराळयान चंद्रावर पाठवून जपाननेही आपल्या अंतराळ कार्यक्रमाला सुरूवात केली. 01 नोव्हेंबर १९९४, २५जुलै १९९४, ७ जानेवारी १९९८, ३० जून २००१ अशा चांद्रमोहिमा अमेरिकेने यशस्वी केल्या.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका