शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

हरयाणात अनोखा विवाह सोहळा : नवरा-नवरी आणि वऱ्हाडीही दृष्टिहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:01 IST

फुलांनी सजवलेल्या ई-रिक्षामध्ये वधूला बसवून घेऊन गेला...

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : हरियाणात एका अनोखा विवाह सोहळा पार पडला असून, त्याची जगभर चर्चा होत आहे. यात नवरा-नवरी तर दृष्टिहीन होतेच. त्याचबरोबर वऱ्हाडीही दृष्टिहीन होते. सप्तपदी घेतल्यानंतर वर वधूला सजवलेल्या ई-रिक्षामधून घेऊन गेला. भिवानी शहराच्या रूपा-चंपा गल्लीतील जीन माता मंदिरात हा सोहळा थाटात झाला.

दृष्टिहीन संदीप व त्याच्याबरोबर सात फेरे घेणारी मीरा या दोघांनीही दृष्टिहीनांच्या शाळेत शिक्षण घेतले. या दोघांच्या जीवनात आनंद आणण्याचे श्रेय दृष्टीबाधित दिव्यांग सशक्तीकरण संस्थेला जाते. संस्थेचे संचालक सी. के. गोसाई यांनी म्हटले आहे की, संदीप व मीरा यांना एकमेकांच्या मदतीने जीवन यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा देत आहे. या आगळ्या वेगळ्या विवाहाची सध्या हरयाणात आणि सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

डीजेवर नृत्यविशेष म्हणजे या विवाह समारंभात रिबन कापणे, बूट लपविण्यासह इतर विधीही पार पडले. डीजेवर दृष्टिहीनांनी असे काही जोषपूर्ण नृत्य केले की, पाहणारे लोकही उत्साहित झाले. कारप्रमाणे ई-रिक्षाला फुलांच्या हारांनी सजविण्यात आले होते. या वेळी महिलांनी मंगल गीते गायिली व नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर वर-वधू नवीन जीवनाची सुरूवात करण्यासाठी आनंदाने आपल्या घरी गेले.

टॅग्स :marriageलग्न