शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 05:45 IST

सरन्यायाधीशांनी अमेरिकेतील वरिष्ठ फेडरल जिल्हा न्यायाधीश झेड. एस. राकॉफ यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला.

हैदराबाद : सध्या भारतीय न्यायव्यवस्था अनोख्या आव्हानांना तोंड देत आहे. काही वेळा खटल्यांमध्ये निकालासाठी इतका उशीर होतो की, यासाठी अनेक दशके लागत असल्याची खंत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली. नालसार लॉ युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथे झालेल्या दीक्षान्त समारंभाला संबोधित करताना न्यायमूर्ती गवई यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, जर परदेशांत शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत असाल तर ते शिष्यवृत्तीच्या आधारे जा; यामुळे कुटुंबावर आर्थिक ओझे येणार नाही.

सरन्यायाधीश म्हणाले की, आपल्या देशासमोर आणि न्यायव्यवस्थेसमोर अनेक अनोखी आव्हाने उभी आहेत. खटल्यांचा निकाल लागण्यास कधी-कधी दशके लागतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती अनेक वर्षे तुरुंगात कैदी म्हणून घालवूनही निर्दोष आढळली आहे. देशातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. यासाठी सरन्यायाधीशांनी अमेरिकेतील वरिष्ठ फेडरल जिल्हा न्यायाधीश झेड. एस. राकॉफ यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. या पुस्तकाचं शीर्षक आहे: ‘काही निरपराध दोषी ठरतात आणि काही दोषी सुटतात : आणि आपल्या खिळखिळ्या कायदाशास्त्रीय व्यवस्थेतील विरोधाभास.’ या पुस्तकात राकॉफ यांनी नमूद केले आहे की, ‘मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की, आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे.’

पदवी गुणवत्तेची हमी नव्हेपरदेशात मास्टर्स डिग्रीसाठी जाण्याबाबत दबाव असतो, याकडे लक्ष वेधताना सरन्यायाधीश म्हणाले, फक्त परदेशी पदवी ही तुमच्या गुणवत्तेची हमी नव्हे. हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेऊ नका. अन्यथा कर्ज, चिंता, आर्थिक ओझं आणि गोंधळलेलं करिअर तुमच्या वाट्याला येईल. काही जण परदेशात शिक्षणासाठी ५०-७० लाख रुपयांचे कर्ज घेतात. ही रक्कम स्वतंत्र वकिली सुरू करण्यासाठी वापरा.

कामाचे तास जास्त...‘कायदा क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक तणावाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. कामाचे तास खूप जास्त असतात, अपेक्षा प्रचंड असतात आणि अनेक वेळा कामाची संस्कृती ‘निर्दयी’ वाटते,’ असे ते म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय