शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 05:48 IST

Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविल्याची चर्चा आहे, परंतु संयुक्त किसान मोर्चापर्यंत अद्याप कोणताही प्रस्ताव पोहोचला नाही. कडाक्याच्या थंडीतही कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी लढा देत आहेत. परंतु सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने  त्यांचा संयम तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.‘लोकमत’शी बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील म्हणाले की, सरकारने प्रस्ताव पाठवल्याच्या बातम्या माध्यमातूनच मिळत आहेत. परंतु आमच्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करू. तिन्ही कायद्यावर याआधी चर्चा झाली आहे. त्यामुळे तो विषय सोडून थेट ‘एमएसपी’वर चर्चा करू. आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूचनाशिक : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. 

साखळी उपवास आंदोलन - गेले २६ दिवस अत्यंत संयमाने आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर बसून आहेत. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली