शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘ते बायजेट नाही बजेट आहे, रिलाय नव्हे तर रिप्लाय आहे’; रामदास आठवलेंनी घेतली थरूर यांची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 10:47 IST

आठवलेंनी काढल्या थरूर यांच्या चुका, हा मजकूर इंग्रजीत लिहिताना थरूर यांनी दोनवेळा बजेट शब्दाचा उपयोग केला आहे. 

नवी दिल्ली : फर्डे इंग्रजी बोलणारे व  प्रसिद्ध लेखक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची ओळख आहे. परंतु केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास यांनी खासदार शशी थरूर यांच्या ट्विटरमधील इंग्रजीत लिहिलेल्या मजकुरात २ चुका दाखवून दिल्या आहेत. त्या ट्विटमध्ये बजेट व रिप्लाय हे शब्द चुकीचे आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. सीतारामन यांचे भाषण सुरू असताना मागील बाकावर राज्यमंत्री रामदास आठवले बसलेले होते. हे छायाचित्र टॅग करून थरूर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात थरूर यांनी लिहिले की, सीतारामन यांनी जवळपास दोन तास अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर दिले. अविश्वासनीय अर्थसंकल्पाने सत्तारुढ पक्षातील सदस्यांनाही धक्का बसला आहे, हे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्पातील दाव्यावर सत्तारुढ पक्षातील नेतेही विश्वास ठेवू शकत नाहीत.

हा मजकूर इंग्रजीत लिहिताना थरूर यांनी दोनवेळा बजेट शब्दाचा उपयोग केला आहे. पहिल्यांदा बजेट शब्द लिहिताना बीयूडीजीईटी ऐवजी बीवायडीजीईटी असे लिहिले आहे. हा मुद्या पकडून आठवले यांनी थरूर यांना ट्विटरवरून उत्तर दिले. प्रिय, शशी थरूरजी, कुणी अनावश्यक दावे व निवेदन करीत असल्यास चुका होतात. ते बायजेट नाही बजेट आहे. तसेच रिलाय नव्हे तर रिप्लाय आहे.

मुझको आती है हंसी... या मिश्किल ट्विटरवादाचे पडसाद नागपुरातही उमटले. पत्रकारांनी यावर कवितेतून उत्तर देण्याची विनंती आठवले यांना केली. तेव्हा आठवले यांनीही लगेच कविता सादर केली. ते म्हणाले, जिनकी इंग्लिश मैंने ट्विटरपर देखी उनका नाम है शशी... उनका बयान देखकर मुझको आती है हंसी...

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShashi Tharoorशशी थरूर