शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला का?; जावडेकर चिडून म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 12:07 IST

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थलायवा रजनीकांत यांना पुरस्कार देण्यात आला का, असा प्रश्न जावडेकर यांना विचारण्यात आला.

ठळक मुद्देरजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कारनिवडणुकांमुळे रजनीकांत यांना पुरस्कार दिल्याचा दावाप्रकाश जावडेकर यांचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने कोट्यवधी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूचाही समावेश आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थलायवा रजनीकांत यांना पुरस्कार देण्यात आला का, असा प्रश्न जावडेकर यांना विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर जावडेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. (prakash javadekar react on rajinikanth to be conferred with dadasaheb phalke award)

प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर उपस्थित पत्रकारांपैकी एकाने रजनीकांत यांना जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचा संबंध जोडत प्रश्न विचारला. यावर जावडेकर यांनी संताप व्यक्त केला आणि योग्य प्रश्न विचारा, अशी विनंती केली. 

“नरेंद्र मोदी दिवसाचे २४ तास खोटं बोलतात, केव्हाही टीव्ही ऑन करा आणि बघा”

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेसृष्टीशी निगडीत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हा पुरस्कारासाठी नेमणूक केलेल्या पाच समीक्षकांनी एकत्रितपणे रजनीकांत यांच्या नावाचा निर्णय घेतला. यात राजकारण कुठून आले, असे स्पष्ट करत रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाविषयी चर्चा केली. गेल्या ५ दशकांपासून रजनीकांत सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असलेल्या ज्युरींनी एकमताने रजनीकांत यांना हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला, असेही जावडेकर म्हणाले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र, अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी  प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.

टॅग्स :rajinikanthरजनीकांतPrakash Javadekarप्रकाश जावडेकरCentral Governmentकेंद्र सरकार