शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ठरल्यावेळीच, केंद्रीय मंत्री गोयल यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 05:59 IST

उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू असल्याची अटकळ बांधली जात असताना पीयूष गोयल यांनी अशा शक्यता फेटाळून लावत सांगितले की, असे काहीही नाही. 

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेण्याची अलीकडे जोरदार चर्चा होती. मात्र, सरकारला कोणतीही घाई नसून राज्यातील विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. येथे एका अनौपचारिक संवादात त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारला निवडणुकीची घाई नाही. ज्यांना निवडणुकीची घाई आहे, त्यांनी निवडणुका घ्याव्यात. भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वेळेपूर्वी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप आणि शिवसेना सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच होतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासूनच कामाला लागला असून अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळेही दोन्ही निवडणुका एकत्र होतील की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

विरोधकांचे परस्परभिन्न दावेकाही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, केंद्र सरकारही वेळेपूर्वी निवडणुका घेऊ शकते, असे वक्तव्य केले होते. विराेधी पक्षांचे सामर्थ्य कमी करण्यासाठी केंद्र सरकार असे पाउल उचलू शकते, असा दावा त्यांनी केला हाेता. देशात विविध राज्यांचे चित्र बदलत असून सत्ताधारी पक्षाला मतदार जागा दाखवित असल्यामुळे माेदी सरकार लाेकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असे वाटत नसल्याचे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला हाेता. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा नाही -  उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू असल्याची अटकळ बांधली जात असताना पीयूष गोयल यांनी अशा शक्यता फेटाळून लावत सांगितले की, असे काहीही नाही. - उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची कोणतीही चर्चा होत नाही. २० जूनला संजय राऊत यांच्याकडून गद्दार दिवस नाव दिल्याच्या मुद्द्यावर पीयूष गोयल म्हणाले की, आपल्या अशा विधानांमुळेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोठून कोठे पोहाेचविले आहे. - गद्दारी कोणी कोणाशी केली हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. निवडणुका लढविल्या भाजपसोबत आणि सरकार बनविले काँग्रेससोबत.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलVidhan Parishadविधान परिषद