शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मोदी सरकारला धक्का; शिवसेनेपाठोपाठ आणखी एक पक्ष बाहेर, मंत्र्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 9:08 PM

प्रस्तावित कृषी विधेयकांवरून एनडीएत फूट; शिरोमणी अकाली दल मोदी सरकारमधून बाहेर

नवी दिल्ली: संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदी सरकारला जोरदार धक्का बसला आहे. संसेदतल्या प्रस्तावित कृषी विधेयकांवरून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.प्रस्तावित कृषी विधेयकांना शिरोमणी अकाली दल विरोध करणार असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी आजच लोकसभेतल्या भाषणात म्हटलं होतं. 'तीन कृषी विधेयकांचा थेट परिणाम पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर होणार आहे. ३० हजार अडते, कृषी बाजारपेठेतील ३ लाख मजुरांना विधेयकामुळे फटका बसणार आहे,' असं बादल म्हणाले होते. तेव्हाच अकाली दल सरकारमधून बाहेर पडणार हे स्पष्ट झालं होतं. शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि आम्ही सरकारच्या कृषी विधेयकांचा विरोध करतो, असं म्हणत बादल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'लोकसभेत काँग्रेसनं केलेले आरोप निराधार आहेत. आम्ही कधीही यू-टर्न घेतलेला नाही. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. आम्ही सरकारला शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या. आम्ही सगळ्या व्यासपीठांवर याबद्दल आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या समस्या, दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला त्यात यश आलं नाही,' अशा शब्दांत बादल यांनी मोदी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.बादल यांनी संसदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना 'आत्मनिर्भर'वर जोर दिला. 'देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. पंजाबमध्ये सरकारांनी शेतमालासाठी आधारभूत किमतीचा ढाचा तयार करण्याचं अवघड काम केलं आहे. मात्र मोदी सरकारचं विधेयक या ५० वर्षांच्या तपस्येवर पाणी फिरवणारं आहे. त्यामुळे हरसिमरत कौर राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडतील,' असं बादल म्हणाले होते.

टॅग्स :Shiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलNarendra Modiनरेंद्र मोदी