शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

PM Narendra Modi Security Breach :"महादेवाच्या कृपेने मोदी वाचले, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं त्यांची हत्या झाली असती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 08:46 IST

Giriraj Singh On PM Modi Security Breach : भाजपच्या नेत्याचं मोठं वक्तव्य. पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे.

Giriraj Singh On PM Modi Security Breach : पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला होता. याप्रकरणी आता पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवांना लिखित रिपोर्ट सोपवला आहे. यामध्ये याप्रकणी स्थापन केलेली समिती तीन दिवसांत अहवाल सोपवणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय केंद्रीय गृह मंत्रायलानंदेखी पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पहिला एफआयआर दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या त्रुटीवरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही देखील होऊ शकली असती, अशी शक्यता केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मरणाच्या विहिरीत अडकवणं हा काही योगायोग नव्हता. याची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हे षडयंत्र पंजाबचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंतच नाही, तर त्याच्या वर पर्यंत त्याचे धागेदोरे सापडतील. त्यांची हत्या ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं झाली असती," अशी शक्यताही गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

"जी घटना त्यांच्यासोबत घडली तो योगायोग नव्हता. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता किती आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. ही घटना देशाच्या पंतप्रधानांसोबत नाही, तर संपूर्ण देशासोबत घडली आहे. ज्यांनी स्वत: षडयंत्र रचलं ते काय तपास करणार?." असा सवालही त्यांनी केला.रेकॉर्ड सुरक्षित ठेवा - न्यायालयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील आढळलेल्या त्रुटीप्रकरणी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा (CJI NV Ramana) यांनी प्रवासाची नोंद आणि तपास यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, न्यायालयाने पंजाब पोलीस अधिकारी, एसपीजी आणि इतर एजन्सींना सहकार्य करण्यास आणि संपूर्ण रेकॉर्ड सील करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.

सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. यासोबतच या प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सोमवारपर्यंत थांबवण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र आणि राज्याला दिले आहेत. तसेच, तोपर्यंत केंद्र आणि राज्यांना त्यांच्या तपासाच्या आधारे कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई करता येणार नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबBJPभाजपा