शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 11:26 IST

गिरीराज सिंह यांच्याकडून पंतप्रधानांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

पाटणा: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. वादग्रस्त विधानं करणारे गिरीराज सिंह त्यांच्या नव्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान देवाचे अवतार असल्याचं सिंह म्हणाले आहेत. बेगुसरायमधल्या साहेबपूर कमाल विधानसभा मतदारसंघातल्या फूल चौकमध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. नव्या भारताचा उदय झाला असून यापुढे भारतामातेकडे आणि भारतीयांकडे डोळे रोखून पाहणाऱ्यांचे डोळे काढून घेतले जातील, असंदेखील त्यांनी म्हटलं. पंतप्रधान देवाचे अवतार असल्याचं गिरीराज सिंह म्हणाले. मात्र त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख टाळला. 'कोणी वाईट वाटून घेऊ नका. देवाचा उदय झालेला आहे. तुम्ही त्यांना ३०३ जागा देऊन विजयी केलं आहे. तेच तुमच्यासाठी देव आहेत. ते देशाचे पंतप्रधान असेपर्यंत जगातील कोणतीही शक्ती भारतमातेचा अपमान करू शकत नाही,' असं सिंह यांनी म्हटलं. भारतीयांना, भारतमातेकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढून घेऊ. कारण नव्या भारताचा उदय झाला आहे, असं गिरीराज सिंग म्हणाले. त्यांनी भारतीयांना झोपलेल्या वाघाची उपमा दिली. झोपलेल्या वाघाला उठवणं महागात पडेल, असंही त्यांनी म्हटलं. बेगुसरायमधल्या फूल चौक परिसरात १२ जानेवारीपासून सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलन सुरू आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी