शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की; विद्यापीठ परिसरात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 21:08 IST

अभाविपच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रियोंविरोधात घोषणाबाजी

कोलकाता: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात कार्यक्रमासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना विरोधाचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी सुप्रियोंना घेराव घालत काळे झेंडे दाखवले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुप्रियो विद्यापीठात आले होते. यावेळी डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सुप्रियोंविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी जवळपास दीड तास सुप्रियोंचा प्रवेश रोखून धरत त्यांना धक्काबुक्की केली. बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळताच राज्यपाल जगदीप धनखर यांनी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांनाही विरोध दर्शवला. त्यामुळे राज्यपाल बराच वेळ गाडीतच अडकून पडले. यानंतर राज्यपालांनी सुप्रियोंसोबत विद्यापीठ परिसरातून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळीही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. मी इथं राजकारण करायला आलेलो नाही. मात्र ज्या प्रकारे काही विद्यार्थ्यांनी मला धक्काबुक्की केली, त्यामुळे मी निश्चितच दु:खी आहे, असं सुप्रियो म्हणाले.  सुप्रियो यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर बाटल्या फेकल्या आणि त्यांचा चश्मादेखील तोडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सुप्रियो यांना घेराव घातल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यपालांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. सुप्रियोंना विद्यार्थ्यांनी अडवून धरलं असताना कुलगुरुंनी पोलिसांना विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश दिला नाही, असादेखील आरोप होत आहे. 

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल