शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ताफ्यात जास्त वाहने असल्याने अधिकाऱ्याने हटकले, मोदींचे मंत्री भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 09:21 IST

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बक्सर - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नेतेमंडळींना आचारसंहितेच्या चौकटीत राहून प्रचार करावा लागत आहे. दरम्यान, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवरून केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर उलटसुटल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाकडून सलग दुसऱ्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबै बक्सर या आपल्या मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत वाहनांचा मोठा ताफा होता. त्यावेळी बक्सरचे एसडीएम के.के. उपाध्याय यांनी ताफ्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने मंत्रिमहोदयांकडे विचारणा केली. त्यामुळे अश्विनीकुमार चौबै संतापले.  अश्विनीकुमार चौबे आणि एसडीएम यांच्यात झालेल्या विवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात एसडीएम चौबे यांचे वाहन अडवून त्यांना नियमभंग झाल्याचे सांगताना दिसत आहेत. मात्र त्यामुळे अश्विनीकुमार चौबे संतापल्याचे दिसत आहे. तसेच अशा प्रकारचा आदेश कुणी दिला आहे, अशी विचारणा ते करताना दिसतात.दरम्यान, एसडीएम के.के. उपाध्याय हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे. मात्र भकलेले मंत्रिमहोदय हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. तसेच '' कुणाचा आदेश आहे, कुणाचा आदेश आहे. चला मला तुरुंगात पाठवा, असे संतापून सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBiharबिहारbuxar-pcबक्सरBJPभाजपाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019