शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 20:27 IST

Kiren Rijiju Car Accident: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला जम्मू-काश्मीरमध्ये अपघात झाला आहे. रिजिजू हे प्रवास करत असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली.

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला जम्मू-काश्मीरमध्येअपघात झाला आहे. रिजिजू हे प्रवास करत असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने रिजिजू या अपघातातून बालंबाल बचावले असून, या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच रिजिजूसुद्धा पूर्णपणे ठीक आहेत.

रिजिजू आज जम्मू-काश्मीरमध्ये दौऱ्यावर होते. तिथे रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने केंद्रीय कायदेमंत्र्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर घटनास्थळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत रिजिजू यांना अपघातग्रस्त कारमधून उतरवून दुसऱ्या कारमध्ये बसवले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री आपघातग्रस्त कार आणि टक्कर मारणार ट्रक दिसत आहे. तसेच सुरक्षा कर्मचारी किरेन रिजिजू यांच्या गाडीजवळ पळत येताना दिसत आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर आणून दुसऱ्या कारकडे नेतानाही दिसत आहेत. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघातCentral Governmentकेंद्र सरकार