शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 17:23 IST

Corona Vaccination : भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते.

गांधीनगर : पाच ते 15 वयोगटातील मुलांना कोरोना लसीचे डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी भाष्य केले. ते म्हणाले की, तज्ज्ञांच्या समूहाने शिफारस केल्यावर सरकारकडून या वयोगटासाठी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. मात्र, तज्ज्ञांच्या समूहाकडून  याबाबत अद्याप कोणतीही शिफारस केलेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ही माहिती दिली. भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'कोणत्या वयोगटात, कधीपासून लसीकरण सुरू करायचे, हे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारशींच्या आधारे ठरवले जाते. या तज्ज्ञांच्या समूहाकडून मुलांसाठी शिफारस प्राप्त होताच आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करू.'

दरम्यान, देशात गेल्या महिन्यात 15 ते 18 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'आज लसीकरण हा मुद्दा नाही. आमच्याकडे पुरेशा लसी आहेत, डोसची कमतरता नाही. आम्ही निश्चितपणे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारसींचे पालन करू. महामारीच्या तिसऱ्या लाटेत भारताने कोरोनाविरुद्धच्या युद्धात लसीकरणाचा प्रभावीपणे वापर केला आहे.'

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य