शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिक बनून रुग्णालयात गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सुरक्षा रक्षकाची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 16:53 IST

Mansukh Mandaviya: सफदरगंज रुग्णालयात मनसुख मांडविया यांना गार्डने शिव्या देत काठीने मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज एक धक्कादायक खुलासा केला. काही दिवसांपूर्वी ते अचानक सफदरगंज रुग्णालयात एक सामान्य नागरिक म्हणून तपासणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयातील एका गार्डने काठीने मारहाण केली. याच सफदरगंज रुग्णालयातील चार आरोग्यविषयक सुविधांच्या उद्घाटन समारंभात मांडविया यांनी हा खुलासा केला आहे.

या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना रुग्णालयातील अनेक गैरसोयी अधोरेखीत करुन दिल्या. याशिवाय, रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करुन रुग्णालयातील गैरप्रकार दूर करावेत आणि रुग्णालयाला मॉडेल हॉस्पिटल बनवावे, असे निर्देशही हॉस्पिटल प्रशासनाला दिले आहेत.

गार्डने काठी का मारली ?उद्घाटन समारंभात डॉ.मांडाविया म्हणाले की, रुग्णालयात ते एक सामान्य रुग्ण म्हणून तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळी ते एका बाकावर बसत असताना गार्डने बाकावर बसू नको असे म्हणत, शिव्या दिल्या आणि काठीने मारहाण केली. याशिवाय, रुग्णालयात इतर रुग्णांना स्ट्रेचर आणि इतर वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात भटकावं लागत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात आलेल्या एका 75 वर्षीय महिलेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महिला आपल्या मुलासाठी स्ट्रेचर मिळवण्यासाठी एका गार्डकडे विनवणी करत होती, पण महिलेला स्ट्रेचर दिले नाही. कार्यक्रमादरम्यान त्यांनी रुग्णालयातील गार्डच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींना दिली घटनेची माहितीमांडविया यांनी या सर्व प्रकाराची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीना दिल्याचही सांगितलं. मांडविया म्हणाले की, मला मारहाण झालेला किस्सा ऐकून मोदींनाही धक्का बसला. त्यांनी काठी मारणाऱ्या गार्डला निलंबित केलं आहे की नाही, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना सांगितलं की, मला एका गार्डला निलंबित न करता संपूर्ण सिस्टीममध्ये सुधारणा करायची आहे, असं मांडविया म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्यdelhiदिल्ली