शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Budget 2021 : "सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 10:52 IST

Budget 2021 Latest News and Updates : महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याच दरम्यान अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी अकरा वाजता संसदेत अर्थसंकल्प  (Union Budget 2021-22) सादर करणार आहेत. रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच सामान्यांना प्राप्तिकरात सवलती, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांना भरघोस सवलती इत्यादींसाठी सर्वंकष तरतुदी करण्याची आवश्यकता भासणार असून आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून याच अपेक्षा असतील. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे.  तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याच दरम्यान अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अनुराग ठाकूर यांनी सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल असं म्हटलं आहे. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी ठाकूर यांनी आपल्या घरी पूजा-अर्चना केली आहे. तसेच "सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल. 'सबका साथ, सब विकास, सबका विश्वास' या मोदींच्या घोषवाक्यावर सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती. भारताला कोरोना संकटातून वाचवण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेला तेजीने रुळावर आणण्यासाठी नवी दिशा देण्यात आली" असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला

देशाचा अर्थसंकल्प आज संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. बाजार उघडाच सेन्सेक्सने ( Sensex ) ४४३ अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीनंही ( nifty ) ११४ अंकाची वाढ नोंदवली आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सुरु होताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४४३ अंकांच्या वाढीसह ४६,७२८ अंकांसह सुरू झाला आहे. तर निफ्टी ११४.८५ अंकांच्या वाढीसह १३,७४९.४५ वर उघडला आहे. 

दरम्यान, शुक्रवारी 'बीएसई'च्या ३० शेअरवर आधारित प्रमुख सेन्सेक्स २,५९२.७७ अंक म्हणजेच ५.३० टक्क्यांनी घसरून ४५,२८५.७७ वर बंद झाला होता. तर 'एनएसई'च्या ५० शेअरवर आधारित प्रमुख निफ्टीही मागच्या आठवड्याच्या तुलनेत ७३७.३० अंकांनी म्हणजेच ५.१३ टक्क्यांनी घसरून १३,६३४.६० वर बंद झाला. या महिन्यात ऐतिहासिक उच्चांकापर्यंत पोहोचल्यानंतर सेन्सेक्स जवळपास ४,००० अंकांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर निफ्टीत १,००० अंकांची घसरण झाली होती.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Budgetअर्थसंकल्पNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत