शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

उत्तराखंडमध्ये याच महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार, सीएम धामींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 21:26 IST

UCC in Uttarakhand : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे.

UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्येसमान नागरी कायदा(UCC) कधी लागू होणार, हे आता निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी UCC संदर्भात मोठी घोषणा केली आहे. याच महिन्यात(जानेवारी 2025) समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे पुष्कर सिंह धामी यांनी जाहीर केले आहे. तसेच, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 

UCC कोणत्या तारखेला लागू होईल?धामी सरकार 1 जानेवारी 2025 पासून राज्यात UCC लागू करेल, असे मानले जात होते. मात्र, स्थानिक निवडणुकांबाबत अधिसूचना जारी झाल्यामुळे सरकार 23 जानेवारीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. अशा स्थितीत उत्तराखंडमध्ये 26 जानेवारी 2025 पासून यूसीसी लागू केले जाईल, असे मानले जात आहे.

UCC लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये कोणते बदल होतील?उत्तराखंडमध्ये UCC लागू झाल्यानंतर विवाह, घटस्फोट, देखभाल, मालमत्ता अधिकार, दत्तक घेणे आणि वारसा यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. घटस्फोटासाठी जात, धर्म किंवा पंथाचा विचार न करता समान कायदा असेल, सध्या देशातील प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या वैयक्तिक कायद्याद्वारे या प्रकरणांचे निराकरण करतात. त्याचबरोबर हलाला आणि इद्दतसारख्या प्रथा बंद होतील. मुलींना वारसाहक्कात मुलांप्रमाणे समान वाटा मिळेल. 

लिव्ह-इन संबंधांची नोंदणी करावी लागेल. आधार कार्ड अनिवार्य असेल. 18 ते 21 वर्षे वयोगटातील जोडप्यांना पालकांची संमती द्यावी लागेल. लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलालादेखील विवाहित जोडप्याच्या मुलाप्रमाणेच हक्क प्राप्त होतील. बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात येईल. मुलींचे लग्नाचे वय, जात किंवा धर्म कोणताही असो, 18 वर्षे असेल. सर्व धर्मांना मुले दत्तक घेण्याचा अधिकार असेल, परंतु इतर धर्मातील मुले दत्तक घेऊ शकणार नाहीत. मात्र, समान नागरी संहितेच्या या मसुद्यातून अनुसूचित जमातींना पूर्णपणे वगळण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर, पूजा पद्धती, परंपरा या धार्मिक बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.  

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाUttarakhandउत्तराखंडBJPभाजपा