शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या 'बॅट'चा 'खेळ खल्लास', घुसखोराला कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 11:44 IST

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

श्रीनगर - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. रविवारी ( 18 फेब्रुवारी ) नियंत्रण रेषेजवळ बडगाम परिसरात संशयित हालचाली निदर्शनास आल्या तसंच लष्करी तळाच्या दिशेनं ग्रेनेडदेखील डागण्यात आले. 

विध्वंसक कारवायांसाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट)नं हा हल्ला केल्याचे बोललं जात आहे.  मात्र या भ्याड हल्ल्याला सतर्क जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. दोन्ही बाजूनं झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,शोधमोहीमेदरम्यान एक मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.  नियंत्रण रेषेजवळ रविवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी 5.25 वाजण्याच्या सुमारास संशयित हालचाली निदर्शनास आल्या. लष्कर तळापासून 100 मीटर अंतरावर या हालचाली दिसून आल्यानंतर जवानांनी त्यादिशेनं गोळीबार केला. यावेळी लष्करी तळावरही दुस-या बाजूनं ग्रेनेड डागण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचा खात्मा करण्यात आला. 

यानंतर शोधमोहीमेदरम्यान परिसरात चार आरपीजीसहीत एक मृतदेह आढळून आला. या हल्ल्याचं नियोजन पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांमुळे पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यश आले नाही.  पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून वारंवार विध्वंसक हल्ले करुन भारतीय जवानांचे मृतदेहांची विटंबना करण्यात येते. या टीमकडून  दहशतवाद्यांसोबत मिळून घुसखोरी करुन हल्ले घडवले जातात. बॉर्डर अॅक्शन टीममध्ये पाकिस्तानी सैनिकांव्यतिरिक्त दहशतवादीदेखील सहभागी असतात.  

एयरफोर्स स्टेशनमध्ये घुसखोरीचा प्रयत्न दरम्यान, बडगाम येथील एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या एका अज्ञात व्यक्तीला कंठस्नान घालण्यात आले आहे. सुरक्षा क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या या व्यक्तीला सुरुवातीला ताकीद देण्यात आली होती. मात्र यानंतरही त्यानं ग्रेनेड हल्ला न रोखल्यानं त्याचा खात्मा करण्यात आला.    

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर