शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:02 IST

Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.'

Rahul Gandhi in Bihar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे 'स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या' मोर्चात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना जागरुक केले. याशिवाय त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. 

सत्याचा मार्ग अवलंबावाराहुल गांधी म्हणाले की, अलीकडेच मी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. तिथे मला विचारण्यात आले की, माझे आजोबा पंडित नेहरू नेमके कोण होते, पंतप्रधान, नेते की स्वातंत्र्यसैनिक? यावर राहुल यांनी उत्तर दिले की, जेव्हा मी याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवते की, माझे आजोबा आणि महात्मा गांधी या दोघांचाही सत्याशी खोलवर संबंध आहे. आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध, गुरु नानक, कबीर आणि नारायण गुरूंमध्येही हीच विचारधारा दिसून येते. प्रत्येकाने सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबला पाहिजे.

राहुल गांधी पुढे म्हणतात, भारतीय संविधान ही नवीन गोष्ट नाही, तर ती हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे. आंबेडकर, फुले, नेहरू यांसारख्या महापुरुषांची विचारसरणी राज्यघटनेत दिसून येते. सावरकरांच्या विचाराचा यात समावेश नाही, कारण ते सत्याच्या मार्गावर चालू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

आर्थिक असमानता...अमेरिकन शेअर बाजाराचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले की, तिथून कोट्यवधींचा नफा झाला, पण त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला नाही. भारतातही तीच परिस्थिती आहे. काही निवडक लोकांनाच आर्थिक फायदा होतो. त्यांनी दोन उदाहरणे दिली: एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक आयआयटी प्राध्यापक. त्यांनी सांगितले की, दोघांमध्येही क्षमता आहे, पण जर ते मागासवर्गीय (OBC/EBC) मधून आले असतील, तर व्यवस्था त्यांना पुढे जाऊ देत नाही. 

त्यांना बँकेचे कर्ज मिळू शकत नाही, रुग्णालये उघडता येत नाहीत आणि सरकारी नोकरशाही त्यांचा मार्ग अडवते. तेलंगणामध्ये आमच्या सरकारने जात जनगणना केली, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की, सरकारी बँकांकडून कर्ज घेणारे लोक ईबीसी, ओबीसी किंवा दलित समुदायाचे नाहीत. या बँकांचे मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापनातही या वर्गांचे प्रतिनिधित्व नाही. जवळजवळ शून्य आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार