शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी ब्रॅण्ड इंडियाचा ठसा जगभर उमटवावा; सीआयआयच्या सभेत मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:15 IST

भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पुढे जाऊ लागली असून, उद्योग, व्यवसायांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, कोणे एकेकाळी विविध कायद्यांनी जखडलेले उद्योग क्षेत्र आता मोकळा श्वास घेऊ लागले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : देशाच्या उद्योग क्षेत्राने उत्पादन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून ‘ब्रॅण्ड इंडिया’चा ठसा जगभर उमटवावा. सरकार कायमच त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआयच्या) वार्षिक बैठकीला ऑनलाइन मार्गदर्शन करताना मोदी यांनी वरील आश्वासन दिले. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा  वेगाने पुढे जाऊ लागली असून, उद्योग, व्यवसायांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, कोणे एकेकाळी विविध कायद्यांनी जखडलेले उद्योग क्षेत्र आता मोकळा श्वास घेऊ लागले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

कायद्यांमध्ये केले योग्य ते बदलआमच्या सरकारने कंपनी कायद्यामध्ये अनेक चांगले बदल केले असून, त्याचे फायदे लवकरच दिसू लागतील. त्याचप्रमाणे कामगार कायद्यामध्येही बदल केले आहेत. या बदलामुळे आता व्यवसाय करणे अधिक सुगम होणार आहे. त्यामुळेच आपण ब्रॅण्ड इंडिया तयार करून त्याचा प्रसार जगभर करण्याची काळाची गरज आहे. यासाठी सरकार सर्व ती मदत उद्योगांना देणार असल्याचे ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था तेजीने पुढे जात असून, त्याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. उद्योजकांनी आता अधिक प्रमाणामध्ये जोखीम उचलण्यास तयार रहावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.