शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? - असदुद्दीन ओवेसी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 11:24 IST

'कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? अजूनही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? कोण आहेत ते ?', असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. 

ठळक मुद्देकोणत्या अधिकाराखाली सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत राम मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ?एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा प्रश्नअसदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? असा संतप्त सवाल विचारला आहे

नवी दिल्ली - कोणत्या अधिकाराखाली सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत राम मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? असा प्रश्न एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. काही दिवसांपुर्वी मोहन भागवत यांनी  अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? असा संतप्त सवाल विचारला. 

'कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? अजूनही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? कोण आहेत ते ?', असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. 

 

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी केले होते. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत हिंदू धर्मातील संत तसेच मठप्रमुख, साधू अशा सुमारे दोन हजार जणांपुढे बोलताना भागवत म्हणाले की, अयोध्येत जे दगड आणण्यात आले आहेत, त्यातूनच आपल्याला राम मंदिर उभारायचे आहे. ते मंदिर उभारले जाईल आणि त्यावर भगवा फडकेल, असा दिवस जवळ आला आहे.

अनेक वर्षाची तपश्चर्या, प्रयत्न आणि त्याग या साºयांमुळेच राम मंदिर उभारणे आता शक्य होत आहे. अर्थात हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे राम मंदिरासाठी सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही मोहन भागवत यांनी बोलून दाखवले. या धर्म संसदेत बोलताना संघप्रमुखांनी देशात संपूर्ण गोहत्याबंदी असायलाच हवी, याचा पुनरुच्चार केला. 

'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद'अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर एकीकडे राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादात मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने एक प्रस्ताव ठेवला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMohan Bhagwatमोहन भागवत