शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली ईडीसीकडून ६ हजार जणांना कर्ज, ६३ कोटी रुपये कर्ज वितरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 21:20 IST

पणजी : राज्यातील बेकारांना रोजगार निर्माण व्हावा तसेच स्वयंरोजगारातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ईडीसीने गोवा चेंबर आॅफ कॉमर्स, भारतीय उद्योग महासंघ, गोवा राज्य उद्योग संघटना यांच्याशी हातमिळवणी करून कृती दल स्थापन केले आहे.

पणजी : राज्यातील बेकारांना रोजगार निर्माण व्हावा तसेच स्वयंरोजगारातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ईडीसीने गोवा चेंबर आॅफ कॉमर्स, भारतीय उद्योग महासंघ, गोवा राज्य उद्योग संघटना यांच्याशी हातमिळवणी करून कृती दल स्थापन केले आहे. ईडीसीने मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत आजपावेतो ६ हजार उद्योजक निर्माण केले. या योजनेत तब्बल ६३ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आणि वसुली ९३ टक्के असल्याचा दावा करण्यात आला. पत्रकार परिषदेत ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी ईडीसीच्या कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री रोजगार योजनेतील सोपस्कार आणखी सुटसुटीत केले जातील. इच्छुकांना लवकरात लवकर कर्ज मिळेल हे पाहू.सीएसआरखाली ४ कोटींची तरतूदगेल्या आर्थिक वर्षात ६0 कोटी रुपये नफा झाल्याचे ते म्हणाले. सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मळा येथील झ-याचे सौंदर्यीकरण पूर्ण झालेले असून लवकरच उद्घाटन केले जाईल. आल्तिनो येथील जॉगर्स पार्क तसेच शाळांना प्रयोगशाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा दिल्या. वृद्धाश्रमांमध्ये राहणा-या वृद्धांनाही मदत केली तसेच अन्य प्रकल्पही हाती घेतले. १ कोटी ३४ लाख रुपये त्यावर खर्च केले असून येत्या वर्षात सीएसआरखाली ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.१00 जणांना जीएसटीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांना संगणक सुविधा तसेच जागाही उपलब्ध करून दिली जाईल. मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आर्थिक मदत घेऊन धंदा, व्यवसाय बरकतीला आणणा-या अनेक जणांच्या यशोगाथा आहेत. अशाच एका तरुणाने ३ कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त करून बंगळुरुमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केल्याची माहितीही कुंकळ्येंकर यांनी दिली. आयटी स्टार्ट अप धोरणाच्या माध्यमातूनही अनेक उद्योग येऊ घातले आहेत. युवकांना प्रशिक्षणाची गरज आहे. त्यादृष्टीने इन्क्युबेशन सेंटरही येत्या दोन-तीन महिन्यांत येईल, असे ते म्हणाले. कृतिदलाचे अध्यक्ष स्वत: कुंकळ्येंकर हे असून भारतीय उद्योग महासंघाचे गोवा प्रदेश अध्यक्ष अत्रेय सावंत, गोवा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संदीप भांडारे, राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष राजकुमार कामत, ईडीसीचे उपाध्यक्ष संतोष केंकरे, व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. वेर्णेकर यांचा या कृतिदलात समावेश आहे. रोजगार निर्मिती व उद्योजकता याबाबत जनतेकडून येत्या ३१ पर्यंत सूचना मागविल्या आहेत. तीन उत्कृष्ट सूचना निवडून संबंधितांना पुरस्कार दिले जातील.

टॅग्स :goaगोवा