शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अस्वीकारार्ह...! मच्छीमारांवरील गोळीबार प्रकरणावरून भारत संतापला; श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना केले पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:39 IST

यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून औपचारिक निषेधही व्यक्त केला आहे...

श्रीलंकेच्या नौदलाने डेल्फ्ट बेटाजवळ मंगळवारी सकाळी गोळीबार केला. यात भारताचे पाच मच्छीमार जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून इतर तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून औपचारिक निषेधही व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही कारवाई अस्वीकार्य आहे. कराईकल बंदराहून मंगळवारी पहाटे डेल्फ्ट बेटाजवळ मासे पकडण्यासाटी गेलेल्या 13 भारतीय मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने सागरी सीमा पार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. यादरम्यान, श्रीलंकन नौदलाने गोळीबार केल्याची माहिती मिळाली होती.

निवेदनानुसार, "हे मच्छीमार परुथी थुराईजवळ मासे पकडत होते. याचवेळी त्यांना श्रीलंकन नौदलाच्या गस्ती घालणाऱ्या बोटीने घेरले. यानंतर, सागरी सीमा पार केल्याच्या आरोपाखाली, एक  मासे पकडणारी बोट आणि 13 मच्छीमारांना श्रीलंकन नोदनाने अटक केली. मच्छीमारांकडून बोट तामिळनाडूकडे घेऊन जात असतानाच, श्रीलंकन नौदलाने कथितपणे गोळीबार केला होता. यात एक श्रीलंकन नौदलाचा अधिकारीही होता. यावेळी एका मच्छीमाऱ्याच्या पायाला गोळी लागली, तर दुसरा एक कुठल्या तरी वस्तूच्या प्रहाराने जखमी झाला. अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना कांगेसंतुरई पोलिसांच्या स्वाधीन  करण्यात आले आहे.

"मासेमारी करणाऱ्या बोटीवरील १३ मच्छिमारांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जाफना टीचिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, त्याच बोटीवरील आणखी तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जखमी मच्छिमारांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारतfishermanमच्छीमार