शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर अशक्य- मुख्य निवडणूक आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:23 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा केला उल्लेख

कोलकाता : निवडणुकांमध्ये पुन्हा मतपत्रिकांचा वापर केला जाणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ठामपणे सांगितले. ईव्हीएमऐवजी निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर सुरू करावा ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सातत्याने लावून धरलेली मागणी निवडणूक आयुक्तांनी अशा प्रकारे फेटाळून लावली.सुनील अरोरा म्हणाले की, निवडणुकांत मतदानाच्या जुन्या पद्धतीकडे पुन्हा वळणे शक्यच नाही. मतपत्रिकांचा पुन्हा वापर करण्याच्या मागणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वारंवार विरोधात निकाल दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे का, या प्रश्नावर सुनील अरोरा म्हणाले की, यासंदर्भात केंद्रीय गृह तसेच विधि खात्याकडून निवडणूक आयोगाला अधिकृतपणे कळवण्यात आल्यानंतरच पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल.आयोग भाजपपुढे झुकल्याची टीकालोकसभा निवडणुकांत ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपने विजय मिळविला आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम पक्ष आदींसह अन्य विरोधी पक्षांनी केला होता. ईव्हीएमच्या विरोधात व व्हीव्हीपॅटच्या मुद्यावरून २१ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.निवडणुकांत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही केली असून, त्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांची कोलकातामध्ये भेट घेऊन या मुद्यावर चर्चाही केली होती. निवडणूक आयोग भाजप व नरेंद्र मोदींपुढे झुकल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात व नंतरही केला होता.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग